लिव्हर (यकृत) शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करतं. जेव्हा लिव्हर योग्य पद्धतीने काम करीत नाही, तेव्हा याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. यकृताचा त्रास असल्यास काही लक्षणं दिसून येतात. अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे यकृताचा आजार, यकृताचा कर्करोग आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. विशेषत: रात्रीच्या वेळी यकृताच्या होणाऱ्या नुकसानीची लक्षणे स्पष्ट दिसतात.
सतत घाम येणे...
रात्रीच्या वेळी झोपताना अनेकदा घाम येतो. मात्र खोली थंड झाल्यानंतरही घाम येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री झोपताना नियमित घाम येत असेल तर हे लिव्हर डॅमेडचं लक्षण असू शकतं.
नक्की वाचा - तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवत असाल सावधान; दुर्लक्ष केल्यास मोठा धोका!
बैचेन अन् भीती वाटणे...
रात्रीच्यावेळी झोपताना बैचेन वाटत असेल किंवा घाबरल्या सारखं वाटत असेल तर लिव्हरमध्ये बिघाड झाल्याचे संकेत असू शकतात. जेव्हा लिव्हर योग्य पद्धतीने काम करीत नाही त्यावेळी बैचेनी आणि भीती निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बैचेन वाटत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नका.
झोपेतून दचकून जागं होणं...
रात्रीच्या वेळी १ ते ४ दरम्यान अचानक झोपेतून जागं होणं, हे लिव्हर डॅमेजचे संकेत असू शकतात. जेव्हा लिव्हर योग्य पद्धतीने काम करीत नाही तेव्हा शरीरातील टॉक्सिनची पातळी वाढते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी झोपेतून अचानक जाग येते. जर सातत्याने तुमची झोप मोड होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)