Long Life Tips: दीर्घायुषी होण्याचा सोपा फॉर्म्युला! रोज 'या' दोन गोष्टी करा अन् दीर्घायुषी व्हा

छोट्या बदलांचा मोठा परिणाम होतो असं संशोधन सांगते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • दररोज फक्त पाच मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका दहा टक्क्यांनी कमी होतो
  • दिवसातून तीस मिनिटांपेक्षा कमी वेळ बसून राहिल्यास मृत्यूचा धोका सात टक्के कमी होण्यास मदत होते
  • आहार, झोप आणि व्यायाम यांचा समन्वय साधल्यास जीवनात दहा वर्षांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Long Life Tips: आजच्या धावपळीच्या युगात तासनतास बसून काम करण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरत आहे. दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये तासनतास घाम गाळतात.  पण ते गरजेचं नसल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. 'द लॅन्सेट' या नामांकित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, दररोज केवळ 5 मिनिटे अतिरिक्त मध्यम स्वरूपाचा व्यायाम आणि 30 मिनिटा पेक्षा कमी वेळ बसणे हा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.  

UK, US आणि स्वीडनसह अन्य देशांमधील 1,35,000 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. संशोधकांच्या मते, जर एखादी व्यक्ती दररोज 5 मिनिटे वेगाने चालण्यासारखी कृती करत असेल, तर मृत्यूचा धोका 10% ने कमी होतो. तसेच, दिवसातील 30 मिनिटे बसून राहण्याऐवजी उभे राहिल्यास किंवा हालचाल केल्यास मृत्यूचा धोका 7% ने घटतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक एडन डोहर्टी यांनी स्पष्ट केले की, अगदी लहान बदलही सार्वजनिक आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम करू शकतात.

नक्की वाचा - Korean Skin: '4-2-4' कोरियन स्किन केअर रूटीनचे करा पालन अन् घरगुती उपायातून मिळवा कोरियन ग्लास स्किन

जीवनशैलीत सुधारणेची गरज केवळ व्यायामच नव्हे, तर आहार आणि पुरेशी झोप यांचा समन्वय साधल्यास आयुष्यात 10 वर्षांपर्यंत वाढ होऊ शकते. दिवसातून काही मिनिटे जास्त झोप आणि आहारात थोड्या जास्त भाज्यांचा समावेश करणेही फायदेशीर ठरते. मध्यम स्वरूपाची हालचाल महत्त्वाची आहे. फोनवर बोलताना उभे राहणे किंवा चालणे, घरची छोटी कामे स्वतः करणे आणि बसून राहण्याचा वेळ कमी करणे हे दीर्घायुष्याचे गुपित आहे. सुरुवात लहान असली तरी त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारा असतो.

महत्त्वाची आकडेवारी

  • 5 मिनिटे: रोज अतिरिक्त वेगाने चालल्यास मृत्यूचा धोका 10% कमी होतो.
  • 30 मिनिटे: बसून राहण्याचा वेळ कमी केल्यास आरोग्यात 7% सुधारणा होते.
  • 10 वर्षे: आहार, व्यायाम आणि झोप योग्य असल्यास 10 वर्षे जास्त जगण्याची शक्यता.

छोट्या बदलांचा मोठा परिणाम होतो असं संशोधन सांगते. 5 मिनिटे जास्त झोप, 2 मिनिटे जास्त वेगाने चालणे आणि आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवणे यामुळे खराब जीवनशैली असलेल्यांचे आयुष्यही 1 वर्षाने वाढू शकते. तर उत्तम सवयी पाळणारे लोक 10 वर्ष जास्त जगू शकतात असं संशोधनात समोर आलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Vastu Shastra Tips: घरात कबुतराने अंडी दिली तर काय होते? शुभ की अशुभ? जाणून घ्या सविस्तर माहिती