रात्री उशीरा खाल्ल्यानं वजन वाढतंय? 'या' पोषक गोष्टींचा करा आहारात समावेश

तुम्हाला वजन वाढू न देता रात्री काय खावं? हा प्रश्न पडला असेल तर काही पौष्टिक पर्याय आम्ही सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Low Fat Late-Night Snakes:  रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्या-पिण्याच्या चुकीच्या गोष्टींचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आपण अनेकदा रात्री उशीरापर्यंत टीव्ही किंवा मोबाईल पाहतो. त्यामुळे वेळेवर झोपत नाही. तसंच सकाळी लवकर उठत नाही. या प्रकारच्या जीवनशैलीत रात्री उशीरा भूक लागणे ही सामन्य बाब आहे. आपल्यापैकी अनेक जण रात्री भूक लागल्यावर फास्ट फूड खाणे पसंत करतात. त्यामुळे वजन वाढू लागतं. तुम्हाला वजन वाढू न देता रात्री काय खावं? हा प्रश्न पडला असेल तर आम्ही काही लो फॅट स्नॅक्सचा पर्याय तुम्हाला सांगणार आहोत.

मखाना

तुम्हाला रात्री भूक लागत असेल आणि वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर रोस्टेड मखाना हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुमची भूक भागेल त्याचबरोबर वजनही फार वाढणार नाही. इतकंच नाही मखाने हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. 

ड्राय फ्रुट्स

रात्री लागणारी भूक भागवण्याचा आणखी एक चांगला उपाय. तुम्ही रात्री ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. सुका मेवा हा आरोग्याला फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो

ग्रीन टी

ग्रीन टी चे सेवन हा देखील रात्रीचे भूक भागवण्याचा उत्तम उपाय आहे. त्यामुळे भूक शांत होतेच त्याचबरोबर वजन नियंत्रणात राहण्यासाठीही मदत होते.

Advertisement

टीप: ही सामान्य ज्ञानावर आधारित माहिती आहे. यामध्ये कोणत्याही रोगांवरील उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टर किंवा एक्स्पर्टचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी या माहितीसाठी जबाबदार नाही.