LPG Price Hike : रविवारची सकाळ नागरिकांसाठी मोठी धक्का देणारी ठरली आहे. महागाई हळूहळू डोकं वर काढत आहे. ७ जून रोजी रविवारी घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ झाली आहे. किमतीच्या वाढीसह नियमांमध्ये अद्याप कोणतेही बदल झालेला नाही, मात्र तेल विपणन कंपन्यानी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पूर्णपणे प्रभावी आहेत.
ड्यूल कनेक्शनवर निर्बंध...
जर तुमच्याकडे पाइपलाइनने येणारी नॅचरल गॅस PNG चं कनेक्शन आहे, तर तुम्ही घरगुती सिलिंडर घेऊ शकत नाही. पीएमजी सुरू होण्याच्या 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणं अनिवार्य आहे. असं न केल्यास तेल कंपन्या तुमचं एलपीजी कनेक्शन स्वत:हून ब्लॉक करतील.
रीफिल लॉकिंग पीरियड...
दोन गॅस सिलिंडरदरम्यान बुकिंगमधील वेळ वाढविण्यात आली आहे. एक सिलिंडर घेतल्यानंतर दुसरा सिलिंडर २५ दिवसांपूर्वी बुक करता येऊ शकणार नाही. हा नियम शहरातील ग्राहकांसाठी आहे. गावांमध्ये बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांपर्यंत करण्यात आला आहे. ज्यामुळे साठेबाजी रोखता येऊ शकते.
डिलिव्हरी ऑथेन्टिकेशन कोड...
सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत गॅस बुकिंग करताच ग्राहकांच्या फोनवर एक सिक्युरिटी पिन किंवा ओटीपी पाठवलं जातं. डिलिव्हरी बॉयला हा कोड दाखविल्यानंतर सिलिंडर दिला जाईल. यामुळे सिलिंडरचं ब्लॅक मार्केटिंग, गॅस चोरी रोखता येईल. सिलिंडर चुकीच्या पत्त्यावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला डिलिव्हर होणार नाही. गॅस कंपन्यांकडे ग्राहकांचा लाइव्ह डेटा अपडेटेड असेल.
वर्षाचा कोटा ठरवला...
प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात केवळ १२ सबसिडीचे घरगुती सिलिंडर मिळतील. यापेक्षा अधिक सिलिंडरची आवश्यकता असल्याच ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.
एलपीजीसह पीएनजीच्या किमतीही वाढल्या?
घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र अद्याप तरी पीएनजी म्हणजे पाइपलाइनद्वारे येणाऱ्या नॅचरल गॅसच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.