Surya Grahan: सूर्यग्रहणाआधी लागणार चंद्रग्रहण; भारतात दिसणार की नाही? पाहा अचूक वेळ

भारतात चंद्रग्रहण दिसणार असल्याने, सुतक काळ वैध असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सुतक काळ सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी वैध होतो. तर चंद्रग्रहणात, सुतक काळ ९ तास आधी सुरू होतो. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Surya grahan timing 2025 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण २९ मार्च रोजी दिसलं होतं. दरवर्षी किमान २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रह पृथ्वीवरून पाहायला मिळतात. यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण जगातील विविध भागात हे सूर्यग्रहण पाहायला मिळालं, मात्र ते भारतात दिसलं नव्हतं. त्यामुळे भारतातील खगोलशास्त्रज्ञांना आता चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाची प्रतीक्षा आहे.  

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी होणार आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाची वाट पाहत आहेत, मात्र भारतात ते दिसेल की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील आहे. मात्र वर्षातील दुसरे सूर्यग्रहण देखील भारतात दिसणार नाही. हे ग्रहण न्यूझीलंड, फिजी, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात दिसणार आहे. 

(नक्की वाचा- Yogini Ekadashi 2025: यंदाची योगिनी एकादशी आहे खूप खास, 19 वर्षानंतर जुळून आलाय दुर्मीळ योग)

चंद्रग्रहण भारतात दिसणार

दुसऱ्या सूर्यग्रहणापूर्वी, वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. हे ग्रहण ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतासोबतच ते संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, पश्चिम, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार, ग्रहणाची वेळ रात्री ९.५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२.२३ वाजेपर्यंत राहील.

भारतात चंद्रग्रहण दिसणार असल्याने, सुतक काळ वैध असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सुतक काळ सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी वैध होतो. तर चंद्रग्रहणात, सुतक काळ ९ तास आधी सुरू होतो. 

Advertisement

(नक्की वाचा-  मधुमेहासह या आजारांसाठी औषधीय हिरवी पानं; सकाळी रिकाम्या पोटी खा आणि पाहा कमाल)

ग्रहणाच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी

>> ग्रहण काळात तुम्ही खाणे-पिणे टाळावे.
>> शुभ कार्य करणे टाळावे.
>> ग्रहण काळात तुम्ही प्रवास करणे टाळावे.
>> ग्रहण काळात तुम्ही देव-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये.
>> ग्रहण काळात वृद्ध आणि मुलांनी उपवास करू नये.
>> याशिवाय, तुम्ही उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article