Lungs Cancer: खोकला येण्यापूर्वीच 'या' दोन गोष्टी देतात कॅन्सरचे संकेत, वेळीच ओळखा नाहीतर होईल घात

सर्वात मोठी समस्या ही आहे की ही सर्व लक्षणे इतर अनेक सामान्य आजारांशी मिळतीजुळती असतात.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • फुफ्फुसांच्या कर्करोगाचे सुरुवातीचे अनेक संकेत मिळतात.
  • बोटांच्या टोका गोलसर होणे आणि नखे वाकणे या फिंगर क्लबिंग ही सुरूवातीची लक्षणे आहेत.
  • मनगट आणि घोट्यांमध्ये अचानक सूज व वेदना होणे HPOA या स्थितीशी संबंधित असून कर्करोगाचा गंभीर संकेत असू शकतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Lung Cancer Signs: जेव्हा कधी फुफ्फुसांच्या कर्करोगाचा (Lung Cancer) उल्लेख होतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी सततचा खोकला, छातीत दुखणे, आवाज बसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे असे विचार येतात. याच कारणामुळे बहुतेक लोक फक्त अशाच लक्षणांकडे लक्ष देतात. परंतु, फार कमी लोकांना माहित आहे की या आजाराचे काही सुरुवातीचे संकेत फुफ्फुसांपासून नव्हे, तर शरीराच्या इतर भागांतून दिसू लागतात. जसे की तुमचे हात, पाय, बोटे आणि त्वचा. होय, अनेकदा शरीर या छोट्या संकेतांद्वारे धोक्याचा इशारा आधीच देऊ लागते. तर खोकला, थकवा किंवा वजन कमी होणे यासारखी सामान्य लक्षणे अजून सुरूही झालेली नसतात. बोटे जाड होणे, नखांचा आकार बदलणे, हात किंवा पायांना सूज येणे, त्वचेत अचानक बदल होणे किंवा लाल चट्टे येणे, ही सर्व फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात.

नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार

सर्वात मोठी समस्या ही आहे की ही सर्व लक्षणे इतर अनेक सामान्य आजारांशी मिळतीजुळती असतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही. परंतु, जर हे बदल अचानक दिसू लागले, वेगाने वाढले किंवा दीर्घकाळ टिकून राहिले, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया फुफ्फुसांच्या कर्करोगाचे ते संकेत जे हात आणि पायांवर दिसून येतात.

1. बोटांची टोके गोल होणे आणि नखे वाकणे (Finger Clubbing)
'फिंगर क्लबिंग' हा एक अतिशय विशिष्ट संकेत आहे. जो फुफ्फुसांच्या गंभीर आजाराशी संबंधित असतो. यामध्ये बोटांची टोके गोल, जाड आणि थोडी सुजलेली दिसतात. नखे खालच्या बाजूला वळू लागतात आणि नखे व त्वचा यांच्यातील कोन (angle) रुंद होतो. कधीकधी बोटांमध्ये हलकी उष्णता देखील जाणवते. हे बदल शरीरातील रक्तवाहिन्या आणि उतींमध्ये (tissues) होणाऱ्या असामान्य बदलांमुळे होतात.

2. मनगट आणि घोट्यांमध्ये सूज व वेदना
जर अचानक मनगट किंवा घोट्याला सूज येऊ लागली, वेदना होऊ लागल्या किंवा चालणे कठीण झाले, तर हा एक गंभीर संकेत असू शकतो. याला वैद्यकीय भाषेत HPOA म्हटले जाते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडे आणि सांध्यांच्या आसपास सूज येते आणि याचा संबंध फुफ्फुसांच्या कर्करोगाशी असू शकतो.

Advertisement

3. हाताच्या हाडांमध्ये विचित्र वेदना
अनेक लोक कोणत्याही कारणाशिवाय नडगीच्या किंवा हाताच्या हाडांमध्ये वेदना अनुभवतात. ही वेदना कधी हलकी तर कधी तीव्र असू शकते आणि कधीकधी स्पर्श केल्यावरही टोचल्यासारखे वाटते. हे हाडांमधील बदलांमुळे (Periostitis) होते. क्ष-किरण (X-ray) किंवा बोन स्कॅनमध्ये हे बदल स्पष्ट दिसतात.

4. पाय अचानक सुजणे किंवा गोळा येणे
जर एक पाय अचानक सुजला, गरम वाटू लागला किंवा नडगीमध्ये तीव्र वेदना होत असतील, तर हे 'डीप व्हेन थ्रॉम्बोसिस' (DVT) असू शकते. कर्करोग, विशेषतः फुफ्फुसांचा कर्करोग, रक्त घट्ट करू शकतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. DVT ही एक आपत्कालीन स्थिती आहे कारण ही गुठळी पुढे जाऊन जीवघेणी ठरू शकते.

Advertisement

5. मांड्या आणि खांद्यांमध्ये अशक्तपणा
जर तुम्हाला अचानक पायऱ्या चढताना त्रास होत असेल, खुर्चीतून उठणे कठीण जात असेल किंवा हात वर करणे जड वाटत असेल, तर हे स्नायूंच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. याला 'पॅरानेओप्लास्टिक मायोसिटिस' म्हणतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा शरीरातील स्नायू एखाद्या छुप्या कर्करोगामुळे सूज आणि अशक्तपणाचे बळी ठरतात.

6. हात आणि बाहूंवर लाल-निळे डाग किंवा पुरळ
'डर्माटोमायोसिटिस' हे देखील फुफ्फुसांच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. यामध्ये बोटांच्या सांध्यावर लाल किंवा खवलेयुक्त पुरळ येते, डोळ्यांभोवती हलका जांभळा रंग दिसू लागतो आणि उन्हात उघड्या पडणाऱ्या भागांवर रॅशेस येतात.

Advertisement

7. हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणा
जर हात-पायांमध्ये सतत मुंग्या येत असतील, जळजळ किंवा सुन्नपणा जाणवत असेल आणि त्यामागे मधुमेह किंवा व्हिटॅमिन B-12 ची कमतरता यांसारखी कारणे नसतील, तर हे मज्जातंतूंवर परिणाम झाल्याचे लक्षण असू शकते. विशेषतः 'स्मॉल-सेल लंग कॅन्सर'मध्ये अशी लक्षणे जास्त दिसतात.