Magh Purnima 2026 Date Shubh Muhurat and Puja Vidhi: सनातन परंपरेमध्ये माघ महिना भगवान श्री विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीला केलेले स्नान, दान आणि पूजा अधिक पुण्यदायी तसेच फलदायी ठरते. माघ महिन्यातील पौर्णिमेला माघी पौर्णिमाही म्हटलं जातं. मान्यतेनुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला पूजा, जप, तप केल्यास संपूर्ण माघ महिन्याचे पुण्यफळ प्राप्त होते. सर्व दुःख दूर करून इच्छा पूर्ण करणारी माघ पौर्णिमा यंदा कधी आहे आणि या दिवशी श्रीहरिची पूजा कशी करावी? जाणून घेऊया सविस्तर जाणून घेऊया.
माघ पौर्णिमा 2026 शुभ मुहूर्त | Magh Purnima 2026 Shubh Muhurat | Magh Purnima Shubh Muhurat
सनातन परंपरेनुसार माघ महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते. यंदा माघी पौर्णिमेची तिथी 01 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 05:52 वाजता सुरू होऊन 02 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 03:38 वाजता समाप्त होईल. यानुसार स्नान, दान, पूजा, जप-तप यासाठी माघी पौर्णिमा 01 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केली जाईल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 05:26 वाजता आहे.

माघ पौर्णिमेची पूजा विधी | Magh Purnima 2026 Puja Vidhi | Magh Purnima Puja Vidhi
माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एखाद्या जलतीर्थावर स्नान करून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- त्यानंतर सूर्यदेवाची उपासना करत तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य द्यावे.
- यानंतर घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात चौरंग मांडून भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाता यांची विशेष पूजा करावी.
- श्री सत्यनारायण व्रत कथा आणि श्रीसूक्ताचे पठण करावे.
- श्रीहरिच्या मंत्रांनी हवन करून पूजेचा समारोप श्री लक्ष्मीनारायण देवांची आरती करून करावा.
- माघ पौर्णिमेचे पुण्यफळ मिळवण्यासाठी संपूर्ण दिवस विधीपूर्वक व्रत ठेवावे.
- संध्याकाळी उगवत्या चंद्रदेवाला दूध आणि जल अर्घ्य अर्पण करावे.
- हिंदू धर्मात देवी-देवतांचे आशीर्वाद, ग्रह-नक्षत्रांचे शुभ फळ आणि व्रताचे पुण्य मिळवण्यासाठी दान सर्वोत्तम उपाय मानला जातो.
- माघ महिन्याच्या पौर्णिमेचे पुण्यफळ मिळवण्यासाठी या दिवशी विशेषतः तीळ, गूळ, वस्त्रे, तूप, गाय, अन्न, धन इत्यादी गोष्टींचे दान करावे.
- मान्यतेनुसार माघी पौर्णिमेला या वस्तूंचे दान केल्याने विविध दोष दूर होतात आणि जीवनात शुभता तसेच सौभाग्य टिकून राहते.
हिंदू मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून गंगा, यमुना, गोदावरी यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार दान करावे.
- माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणांची कथा ऐकावी आणि श्रीहरिंची आरती करावी.
- माघ पौर्णिमेला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी.
- पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि फळांचे दान करावे.
- वापरलेली किंवा काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नये.
- माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाचे विशेष दर्शन, पूजन करून अर्घ्य अर्पण करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world