- श्रीकेतन कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
Maghi Ganesh Jayanti 2026 Date: माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी केली जाते. या पावन तिथीला ‘तिलकुंद चतुर्थी' किंवा ‘वरद चतुर्थी' असेही म्हणतात. शास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व अतिशय विलक्षण आहे.
माघी गणेश जयंती 2026 कधी आहे? Maghi Ganesh Jayanti 2026 Date
22 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे.
श्री गणेश जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व | Ganesh Jayanti 2026 Importance
गणेश तत्त्व 1 सहस्त्र पटीने कार्यरत असते. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला पृथ्वीवर श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा तब्बल 100 पटीने अधिक कार्यरत असते. या दिवशी केलेली उपासना लवकर फळ देणारी ठरते.
अधोलोकातील नकारात्मक लहरींचे नियंत्रण
श्री गणपती ही निवारक देवता आहेत. या दिवशी गणेश तत्त्व अधिक असल्याने पाताळातून येणाऱ्या त्रासदायक, नकारात्मक लहरींचे नियंत्रण होण्यास मदत होते.
तिळाचे विशेष महत्त्व (तिलकुंद चतुर्थी) | Ganesh Jayanti 2026 Til Seeds Or Sesame Importance
- तिळामध्ये सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अत्यंत जास्त असते.
- तिळाचे उटणे लावून स्नान करावे.
- तिळाच्या पदार्थ सेवन करावे.
- तिळामुळे शरीर आणि मनातील सात्त्विकता वाढते.
1 नामस्मरण: ‘ॐ गं गणपतये नमः' किंवा सनातन संस्थेनुसार – ‘श्री गणेशाय नमः' हा नामजप जास्तीत जास्त करावा.
2. अभिषेक आणि पूजा : श्री गणेशाच्या मूर्तीला किंवा फोटोला षोडशोपचार पूजा करावी. शक्य असल्यास श्रीसूक्ताने अभिषेक करावा.
3. दुर्वा अर्पण : गणपतीला 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. दुर्वांमध्ये गणेश तत्त्व आकृष्ट करण्याची शक्ती सर्वाधिक असते.
4 नैवेद्य: तिळाचे लाडू, तिळापासून बनवलेले पदार्थ, मोदक यांचा नैवेद्य अर्पण करावा.
सनातन संस्थेनुसार, कोणतीही धार्मिक कृती केवळ कर्मकांड न करता भाव ठेवून केल्यास त्याचे फळ अनेक पटीने वाढते. "आज गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश माझ्या समोर उपस्थित आहेत आणि मी त्यांची सेवा करत आहे" असा भाव ठेवल्यास आध्यात्मिक प्रगती अतिशय जलद होते.
महत्त्वाची टीप | What Is The Difference Between Magh Ganesh Chaturthi And Sankashti Chaturthi- गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी) – श्री गणेशाचा जन्मदिवस
- संकष्ट चतुर्थी (वद्य चतुर्थी) – मासिक उपासना
- दोन्ही तिथींमधील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)