- यंदा 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे
- शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करून विधीवत पूजा करावी
- महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक आवर्जून करावा
Maha Shivratri 2026 Date And Shubh Muhurat: सनातन परंपरेमध्ये शिव पूजनासाठी महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मान्यतेनुसार याच पवित्र तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. तसेच या पवित्र रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपाने प्रकट झाले, अशीही मान्यता आहे. भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त करून देणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्सव यंदा कधी आहे? चार प्रहरांमध्ये केल्या जाणाऱ्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? महाशिवरात्रीचे 10 महाउपाय कोणते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
महाशिवरात्री 2026 कधी आहे? | Maha Shivaratri 2026 Date
भगवान शिवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाणारी महाशिवरात्री यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवार) रोजी आहे.
महाशिवरात्री 2026 तिथी | Mahashivaratri 2026 Tithi
- महाशिवरात्र तिथी प्रारंभ : 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 वाजता
- महाशिवरात्र तिथी समाप्त : 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 वाजता
महाशिवरात्री 2026 शुभ मुहूर्त | Maha Shivaratri 2026 Shubh Muhurat | | Mahashivaratri 2026 Shubh Muhurat
निशीथ काळ (मुख्य): उत्तररात्री 12:09 AM वाजेपासून ते उत्तररात्री 01:01 AM वाजेपर्यंत आहे.
मुंबई शहर - उत्तररात्री 12.28 वाजेपासून (AM) ते उत्तररात्री 1.18(AM) वाजेपर्यंत आहे.
प्रहर वेळा:
- प्रथम प्रहर: संध्याकाळी 06:11 वाजेपासून ते रात्री 09:23 वाजेपर्यंत आहे.
- द्वितीय प्रहर: रात्री 09:23 वाजेपासून ते उत्तररात्री 12:35 AM वाजेपर्यंत आहे.
- तृतीय प्रहर: उत्तररात्री 12:35 AM वाजेपासून ते पहाटे 03:47 वाजेपर्यंत आहे.
- चतुर्थ प्रहर: पहाटे 03:47 वाजेपासून ते सकाळी 06:59 वाजेपर्यंत आहे.
व्रत पारण शुभ मुहूर्त: 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:59 AM वाजेपासून ते दुपारी 03:24 वाजेपर्यंत आहे.
महाशिवरात्रीचे 10 महाउपाय | Maha Shivratri 10 Mahaupay1. महाशिवरात्रीच्या दिवशी तन-मन शुद्ध करून शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करावा. हा उपाय केल्यास भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात, असे म्हणतात.
2. भाविकाने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवसाधना करावी. शक्य असल्यास शिवपूजेवेळी शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा.
3. हिंदू मान्यतेनुसार महाशिवरात्रीला भगवान शिवांना दूध अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. शक्य असल्यास गायीच्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करावा.
4. भगवान भोलेनाथांच्या पूजेत पांढरे चंदन आणि भस्म अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने किंवा भस्माने त्रिपुंड अर्पण करावे आणि नंतर प्रसाद म्हणून तोच तिलक स्वतःच्या कपाळावरही लावावा.
5. मान्यतेनुसार पूजेमध्ये रुद्राक्ष अर्पण केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात आणि चांगला आशीर्वादही मिळतो. म्हणूनच भाविकांनी महाशिवरात्रीला विशेष स्वरुपात शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे. त्यानंतर प्रसाद म्हणून लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या धाग्यामध्ये ओवून ते गळ्यात किंवा मनगटावर बांधावे.
6. शंकराच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातील शिवलिंगाची विधीवत पूजा आणि अभिषेक करावी.
7. जन्मकुंडलीत राहू-केतू दोष असल्यास कुश आणि दुर्वाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर 21 पांढरी फुले अर्पण करावीत.
8. भगवान शंकराची पूजा पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने करावी. पूजेदरम्यान क्रोध किंवा नकारात्मक भावना मनात ठेवू नये.
9. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असल्यास स्फटिकाच्या शिवलिंगाची विधीवत पूजा करून गायीच्या कच्च्या दुधाने रुद्राभिषेक करावा. यामुळे सुख-समृद्धी प्राप्त होते.
10. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराचा आशीर्वाद मिळावा किंवा एखाद्या विशिष्ट कार्यात यश मिळवण्यासाठी विद्वान पंडितामार्फत पारद शिवलिंगाची पूजा आणि रुद्राभिषेक करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)