
Mahavir Jayanti 2025 Wishes In Marathi: महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे तीर्थनकर होते. ज्यांचे मूळ नाव वर्धमान असे होते. वर्धमान महावीर यांचा जन्मोत्सव जैन समूह मोठ्या जल्लोषात साजरा करतात. पंचांगनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महावीर जयंती साजरी केली जाते. महावीर यांना वर्धमान (Vardhman), वीर, सन्मति आणि अतिवीर असेही म्हणतात. वर्धमान महावीर यांनी समाजाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग दाखवला. महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये झाला असे मानले जाते. महावीर यांनी तपश्चर्येद्वारे ज्ञानप्राप्ती केली होती आणि त्यांनी आपल्या इंद्रियांवर तसेच भावनांवर विजय मिळवला होता, असेही म्हणतात. महावीर जयंतीनिमित्त कुटुंबीय, नातेवाईक आणि प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महावीर जयंतीच्या शुभेच्छा | Mahavir Jayanti 2025 Wishes In Marathi
1. महावीर यांनी सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली
सर्वांना मानवतेचा धडा शिकवला
अज्ञानाचा अंधकार दूर केला
जगा आणि जगू द्या, ही शिकवण त्यांनी जगाला दिली
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
2. भगवान महावीर यांच्या शिकवणींनुसार
आपले जीवन सत्य, अहिंसा आणि परोपकाराच्या मार्गावर जावं
महावीर जयंतीच्या या पवित्र प्रसंगी आपण सर्वांना त्यांची कृपा प्राप्त होवो
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. महावीर आहेत आपल्या जीवनाचा आदर्श
त्यांच्या शिकवणींनुसार अहिंसा, सत्य आणि प्रेम हेच आपल्या जीवनाचे मूलमंत्र असावे
महावीर जयंतीच्या पवित्र दिवशी त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सदैव सुखमय होवो
शुभ महावीर जयंती!
4. भगवान महावीर यांच्या शिक्षणांचा अवलंब करून
जीवनातील प्रत्येक गोष्टीत दया, प्रेम, आणि अहिंसा यांचा प्रसार करा
महावीर जयंतीच्या या पवित्र दिवशी त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध होवो
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Parenting Tips: रामायणातील या 5 गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा, जीवनामध्ये होईल मोठा फायदा)
5. महावीर जयंतीच्या या खास दिवशी भगवान महावीर यांच्या कडक शिकवणींचा अनुसरण करून
आपल्या जीवनाला नवा आयाम देऊया
त्यांच्या आशीर्वादाने जीवन अधिक आनंदमय आणि प्रगतीशील होईल
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
6. एकही युद्ध न जिंकता, संपूर्ण जग जिंकले
अहिंसेचा कानमंत्र दिला
जगाचे तारणहार महावीर यांना कोटी कोटी प्रणाम
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
7. रागावर शांततेने विजय मिळवा
नीतिमत्तेने दुष्टांचा पराभव करा
असत्याला सत्याने पराभूत करा
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
8. महावीर आहे ज्यांचे नाव
अहिंसा आहे त्यांचा नारा
महावीर यांना माझे कोटी-कोटी प्रणाम
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)
9. सिद्धतांचे सार, आचार्यांचा सहवास
संतांचे समर्थन, अहिंसेचा प्रचार
हे आहे भगवान महावीर यांच्या शिकवणीचे सार
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
10. भगवान महावीरांना कुठे शोधायचे?
त्यांचे दर्शन कुठे करावे?
चंदनासारखी करा भक्ती
भगवान महावीर स्वतः देतील तुम्हाला भेट
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world