- यंदा मकरसंक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल.
- 14 जानेवारी रोजी दुपारी 3.06 वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे
- 14 जानेवारी रोजी 3.06 वाजेपासून ते संध्याकाळी 06.19 वाजेपर्यंत पुण्यकाल असणार आहे.
Makar Sankranti 2026 Date: हिंदू परंपरेमध्ये मकरसंक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा हा सण साजरा केला जातो. पण यंदा मकरसंक्रांती (Makar Sankranti Date) कधी आहे? यावरून लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. 14 जानेवारी की 15 जानेवारी, नेमके कोणत्या दिवशी मकरसंक्रांत साजरी करावी? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालाय. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
मकरसंक्रांती 2026 कधी आहे? When Is Makar Sankranti 2026 | Makar Sankranti 2026 Date
14 जानेवारी रोजी दुपारी 3.06 वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. यानुसार 14 जानेवारी 2026 रोजी मकरसंक्रांती सण साजरा केला जाईल.
मकरसंक्रांती संक्रमण पुण्यकाल | Makar Sankranti 2026 Punyakaal Time | Makar Sankranti 2026 Punyakal
14 जानेवारी रोजी 3.06 वाजेपासून ते संध्याकाळी 06.19 वाजेपर्यंत पुण्यकाल असणार आहे.
Photo Credit: Canva
मकरसंक्रांती सणाचे महत्त्व | Makar Sankranti 2026 Significanceमकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. कर्क संक्रांतीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळास दक्षिणायन असे म्हणतात. शास्त्रांमध्ये उत्तरायणास देवतांचा दिवस म्हटले गेलंय.
(नक्की वाचा: Happy Bhogi 2026 Wishes: परिवर्तन आणि सकारात्मकतेचे विचार मनात रुजवा, भोगी सणानिमित्त पाठवा मंगलमय शुभेच्छा)
मकर संक्रांती सणाच्या पर्वकाळात दान का करावे?मकरसंक्रांती ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ मानला जातो. या काळात केलेली कामं विशेष स्वरुपात फलदायी ठरतात,असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी दान, जप-तप, धार्मिक अनुष्ठान करण्यास अतिशय महत्त्व आहे. सुवासिनींनी नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे दान द्यावे, म्हणजे आपल्या क्षमतेनुसार दान करावे.
Photo Credit: Canva
मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान का करावे?मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्त या काळापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नदीकाठी स्नान करावे, या ठिकाणी स्नान केल्यास पुण्य लाभते असे म्हणतात. पण नदीकाठी स्नान करणं शक्य नसल्यास घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करावे.
(नक्की वाचा: Bhogi 2026 Wishes: तुमच्या आयुष्यातील निराशा दूर होवो, भोगी सणानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा)
सुगड कसे पुजावे?मकर संक्रांतीच्या सणाला सुगड म्हणजे मातीचे छोटे मडके लागतात. सुगडांना हळदी-कुंकू अर्पण करून दोरा गुंडाळला जातो. सुगडांमध्ये गाजर, बोरे, ऊस, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी गोष्टी भरल्या जातात. पाट मांडून, त्याभोवती रांगोळी काढून पाटावर सुगड ठेवले जातात आणि ते पुजलेही जातात. तीन सुगड सवाष्णींना वाण म्हणून द्यावे, एक सुगड तुळशी मातेला आणि एक स्वतः साठी ठेवावा.
(नक्की वाचा: Happy Bhogi 2026 Best Wishes And Greetings: नव्या संकल्पांना नवी दिशा, भोगी सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)