जाहिरात

Makhana Eating Benefits : मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती? किती असावे प्रमाण?

Makhana Eating Benefits In Marathi: मखानाएक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक ड्राय फ्रूट आहे.

Makhana Eating Benefits : मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती? किती असावे प्रमाण?
Makhana Benefits : मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती?
मुंबई:

Makhana Eating Benefits In Marathi: मखानाएक अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक ड्राय फ्रूट आहे. हे पचायला हलके असते आणि यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.

संशोधनानुसार, मखान्यामध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच, यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. पण मखाने खाण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि ते किती प्रमाणात खावे? हे तुम्हीला माहिती आहे का?

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती प्रमाणात खावे मखाना?

एका दिवसात 20 ते 30 ग्रॅम मखाना (म्हणजे साधारणपणे एक छोटी वाटी) खाणे योग्य आहे. जास्त प्रमाणात मखाना खाल्ल्यास पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. मखाना पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने, मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

मखाना खाण्याची योग्य वेळ 

 तुम्ही दिवसातून कधीही मखाना खाऊ शकता. परंतु, सकाळची वेळ यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. तुम्ही तो रिकाम्या पोटी खाल्ला तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

( नक्की वाचा : रात्री उशीरा खाल्ल्यानं वजन वाढतंय? 'या' पोषक गोष्टींचा करा आहारात समावेश )
 

मखाना खाण्याचे फायदे 

तणाव कमी करण्यास मदत: मखान्यामध्ये असलेले मॅग्नेशियम तणाव कमी करून चांगली झोप येण्यास मदत करते.
हाडे आणि दातांसाठी फायदेशीर: कॅल्शियमच्या उपस्थितीमुळे ते हाडे आणि दातांसाठी लाभदायक आहे.
कमी कॅलरी स्नॅक: मखाना एक कमी कॅलरी असलेला स्नॅक आहे.
आवश्यक पोषक तत्वांचा स्रोत: यात कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसोबतच शरीरासाठी अनेक आवश्यक पोषक तत्वे आढळतात.
दररोज मर्यादित प्रमाणात याचे सेवन केल्याने शरीर अनेक समस्यांपासून वाचण्यास मदत करू शकते.

स्पष्टीकरण : या बातमीमधील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी याची कोणतीही जबाबदारी घेत नाही. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com