Never Use 4 Tyeps Of Wallpaper: आजच्या धकाधकीच्या युगात मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण अनेकदा आपल्या मोबाईलची स्क्रीन पाहतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर असलेला वॉलपेपर तुमच्या मानसिक स्थितीवर आणि विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकू शकतो? प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ नीती कौशिक यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, काही प्रकारचे वॉलपेपर लावणे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा दिला आहे.
कोणत्या प्रकारचे वॉलपेपर लावू नयेत?
जास्त गडद रंग: तज्ज्ञांच्या मते, मोबाईल केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर ते आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आपण आपल्या स्क्रीनवर जे पाहतो, त्याचा थेट परिणाम आपल्या अवचेतन मनावर (Subconscious Mind) होतो. जर तुम्ही तुमच्या फोनवर गडद, भीतीदायक किंवा नकारात्मक भावना निर्माण करणारे वॉलपेपर लावले असतील, तर ते तुमच्या मेंदूमध्ये तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढवू शकतात. यामुळे विनाकारण बेचैनी, चिडचिड आणि नैराश्य येऊ शकते.
ब्रोकन हार्ट: 'ब्रोकन हार्ट', तुटलेले नाते किंवा अत्यंत उदासवाण्या प्रतिमा लावणे टाळले पाहिजे. मानवी मेंदू ज्या गोष्टी सतत पाहतो, त्याच विचारांचे आणि ऊर्जेचे रुपांतर वास्तवात करू लागतो. त्यामुळे, सकारात्मकतेसाठी निसर्गाची चित्रे, प्रेरणादायी कोट्स किंवा शांतता देणाऱ्या दृश्यांचा वॉलपेपर म्हणून वापर करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जास्त मजकूर किंवा रंग: खूप जास्त रंग किंवा जड मजकूर असलेले वॉलपेपर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर किंवा डेस्कटॉपवर वापरू नयेत. यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येतो, बॅटरी लवकर संपते आणि स्क्रीनवरील ॲप्स वापरणे कठीण होते.
Shivsena News: ठाकरेंच्या बंडखोर खासदार गटाचे शिवसेनेत विलिनीकरण, लोकसभा अध्यक्षांनी दिली मान्यता