- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या बंडखोर गटाच्या विलिनीकरणाला मान्यता
- विलिनीकरणामुळे शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढली आहे
- लोकसभा सचिवालयाच्या पत्रानुसार शिवसेनेचे आता तेरा खासदार असून गटनेतेपद श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक दणका मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटातून फुटून सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले होते. त्यांच्या या कृतीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. शिवाय या बंडखोरांच्या गटाला मान्यता देवू नये अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केले होती. त्याच बरोबर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार या सर्वांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी ही करण्यात आली होती. मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या सहा जणांच्या बंडखोर गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा सचिवालयाने जारी केले आहे. त्यात हे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची लोकसभेतील ताकद वाढली आहे.
या विलिनीकरणाला मान्यता दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद लोकसभेत वाढली आहे. शिवाय एनडीएमध्ये शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ही बनला आहे. त्यामुळे आपोआप शिंदेंचे दिल्लीतील महत्व वाढणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या विलिनीकरणाला मान्यात दिली आहे. शिवाय जारी केलेल्या पत्रात शिवसेनेचे 13 खासदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांचे नाव आहे. तर ठाकरे गटाचे 3 खासदार असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्ठीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांनी स्वतंत्र गट ही स्थापन केला. नंतर त्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. त्याला ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे निर्णयाचा चेंडू लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला होता. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार अध्यक्षांनी निर्णय शिंदेंच्या पारड्यात टाकला आहे. त्यांनी 6 बंडखोर खासदारांच्या गटला विलिनीकरणाला मंजूरी दिली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला मंजूरी दिली आहे. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय प्रकाशित केला आहे. शिवसनेचे 13 खासदार म्हणून लोकसभेत आता नोंद झाली आहे. तर श्रींकात शिंदे हे त्यांचे गटनेते असतील असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गट काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सहा ही खासदारांना बरखास्त करावे अशी ठाकरेंची मागणी होती. या निर्णयानंतर ते कोर्टाचे दरवाजे ठोठावतात का हे पाहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world