- मेटा ने AI तकनीक से लैस नया स्मार्ट चश्मा लॉन्च किया है जो वर्चुअल और वास्तविक दुनिया के बीच अंतर कम करता है
- मेटा रे-बैन डिस्प्ले स्मार्ट ग्लास में बिल्ट-इन स्क्रीन लगी है जो मैसेज, फोटो और अन्य कंटेंट दिखाती है
- यह चश्मा न्यूरल बैंड नामक सेंसर-पैक ब्रैसलेट के जरिए उंगलियों के इशारों से नियंत्रित किया जा सकता है
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी ‘मेटा'ने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाने युक्त एक स्मार्ट चष्मा आणला आहे. हे नवे ‘मेटा रे-बॅन डिस्प्ले स्मार्ट ग्लास' व्हर्च्युअल आणि वास्तविक जगामधील अंतर कमी करण्याचे काम करतील. भविष्यात आपल्याला कोणता अनुभव खरा आहे, हे ओळखणेही कठीण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चष्म्याच्या साहाय्याने आपण हवेत बोटे फिरवून मेसेजेस पाहू शकू, फोटो पाहू शकू आणि अनेक गोष्टी करू शकू.
AFP अहवालानुसार, हा चष्मा मेटाचा आतापर्यंतचा सर्वात अॅडव्हान्स एआय चष्मा आहे. यामध्ये एक इनबिल्ट स्क्रीन आहे, जी युजर्सना फोनच्या स्क्रीनप्रमाणेच मेसेज, फोटो आणि इतर अनेक गोष्टी पाहण्याची सुविधा आहे. हा चष्मा ‘न्यूरल बँड' नावाच्या सेंसर-पॅक ब्रेसलेटसोबत येतो, ज्यामुळे बोटांच्या साध्या हालचालींनी चष्म्याला नियंत्रित करता येते. म्हणजेच, फोन न वापरता मेसेज पाठवणे आणि कॉल करणे शक्य होईल.
मेटाच्या चष्म्याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत
- पूर्ण चार्ज केलेल्या केससह 36 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ
- एका चार्जवर 4 तासांपर्यंत चालणार
- हाय डेफिनेशन (HD) फोटो आणि व्हिडीओसाठी 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा
- दोन खास ओपन-इयर स्पीकर
- ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत मायक्रोफोन
- 32 जीबी फ्लॅश स्टोरेज
एएफपीच्या अहवालानुसार, या एआय चष्म्याची किंमत $799 आहे, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 70,000 रुपये असेल. मार्क झुकरबर्ग यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, एआय स्मार्ट ग्लास हा पुढील ‘प्रमुख कंप्यूटिंग प्लॅटफॉर्म' बनेल आणि कालांतराने स्मार्टफोनची जागा घेईल.