जाहिरात

Money Saving Tips: लग्नानंतर सर्वात जास्त पैसे कुठे वाया जातात? नव्या जोडप्याना 6 महिन्यानंतर लक्षात येते चूक

जर तुम्हालाही तुमचा बँक बॅलन्स टिकवायचा असेल, तर आजच सावध व्हा आणि अनावश्यक खर्चाला लगाम लावा.

Money Saving Tips: लग्नानंतर सर्वात जास्त पैसे कुठे वाया जातात? नव्या जोडप्याना 6 महिन्यानंतर लक्षात येते चूक

लग्नाचे सुरुवातीचे काही महिने अतिशय स्वप्नवत असतात. मात्र, जसजसा संसाराचा गाडा सुरू होतो, तसतसे अनेक जोडप्यांना एक कटू सत्य समजते, ते म्हणजे—'रिकामे बँक बॅलन्स'. आवेशात येऊन केलेल्या अनावश्यक खर्चामुळे अनेकदा 6 महिन्यांनंतर आर्थिक ओढाताण सुरू होते. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो. मात्र पहिल्या 6 महिन्यांतील अविवेकी खर्च भविष्यातील आर्थिक नियोजनाचा पाया कमकुवत करू शकतो. हौस आणि गरज यातील पुसट रेषा न ओळखल्याने अनेक तरुण जोडपी कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत. 

लग्नानंतर पैसे वाया जाण्याची मुख्य कारणे

अनावश्यक कपड्यांची खरेदी: 
लग्नासाठी घेतलेले भारी भरकम लेहेंगे, साड्या किंवा ब्रँडेड सूट हे नंतर कपाटातच पडून राहतात. वर्षातून एकदाही न वापरल्या जाणाऱ्या या कपड्यांवर लाखो रुपये खर्च करणे ही सर्वात मोठी चूक ठरते.

सोशल मीडियाचा दिखावा: 
इंस्टाग्राम रील्स आणि फोटोंच्या नादात अनेक जोडपे कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्डवर इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करतात. मात्र, जेव्हा दरमहा अवजड ईएमआय (EMI) भरावा लागतो, तेव्हा या सुट्ट्यांचा आनंद पश्चात्तापात बदलतो.

घरसजावटीचा अतिउत्साह: 
नवीन घर सजवताना अनेकदा गरजेपेक्षा जास्त शो-पीस, महागडी क्रॉकरी किंवा न लागणारे गॅजेट्स खरेदी केले जातात. तसेच, स्वस्त पर्यायांच्या नादात निकृष्ट दर्जाचे सामान घेतल्याने ते लवकर खराब होते आणि पुन्हा खर्च वाढतो.

बाहेरचे जेवण आणि पार्ट्या: 
लग्नानंतर सुरुवातीच्या काळात घरी जेवण बनवण्याचे प्रमाण कमी आणि हॉटेलिंगचे जास्त असते. दर वीकेंडला होणारी पार्टी आणि चित्रपट यामुळे खिशाला मोठी कात्री लागते.

Latest and Breaking News on NDTV

आर्थिक गणित कसे सांभाळाल?

  • 1. बजेट डायरी ठेवा: महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे नियोजन करा.
  • 2. गरज ओळखा: कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी ती 'गरज' आहे की 'हौस', याचा विचार करा.
  • 3. गुंतवणुकीवर भर द्या: दिखाव्यावर खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे केव्हाही फायदेशीर ठरते.

लग्नाचे लाडू खाताना ते गोड लागतात, पण त्यानंतर येणारे क्रेडिट कार्डचे बिल अनेकांचा घाम फोडते. हल्लीच्या काळात लग्नानंतरच्या 'हनिमून पिरीयड'मध्ये होणारी उधळपट्टी हा चिंतेचा विषय ठरत आहे. कपड्यांची खरेदी, बाहेरचे जेवण आणि दिखाव्यासाठी केलेला खर्च यामुळे 6 महिन्यांतच जोडप्यांना पैशांची चणचण भासू लागते. जर तुम्हालाही तुमचा बँक बॅलन्स टिकवायचा असेल, तर आजच सावध व्हा आणि अनावश्यक खर्चाला लगाम लावा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com