- पावसाळ्यात त्वचेवर अतिरिक्त तेल साचल्यामुळे पिंपल्स आणि पुरळ येण्याचा धोका वाढतो
- टी ट्री ऑईलमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी व अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असून त्वचेवरील बॅक्टेरिया आणि फंगस वाढ रोखते
- लॅव्हेंडर ऑईलमध्ये अँटीसेप्टिक व अँटी-फ्लॉजिस्टीक गुणधर्म असल्याने ते त्वचेला आराम देतात
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील दमटपणा, वाढलेले प्रदूषण आणि उष्णता यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूत त्वचेवर जास्त प्रमाणात तेल (Sebum) जमा होते. त्यामुळे पिंपल्स आणि पुरळ येण्याचा धोका वाढण्याचे अनेक वेळा समोर आले आहे. या समस्येवर उपाय म्हणून 'ए जी ऑर्गेनिका'चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अर्पित गुप्ता यांनी पावसाळ्यातील स्किनकेअर रूटीनसाठी 2 महत्त्वाच्या इसेन्शियल ऑईल्सचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हे तेल वापरल्याच त्याचा परिणाम लगेचच जाणवतो असा दावा ही केला जात आहे.
टी ट्री ऑईलमधील नैसर्गिक गुणधर्म त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे बॅक्टेरियाची वाढ रोखून फंगल इन्फेक्शन, एक्जिमा आणि पुरळ यापासून त्वचेचे संरक्षण करतात. हे तेल कसे वापरावे हे ही आपण पाहूयात. टी ट्री ऑईल कधीही थेट त्वचेवर लावू नये असं सांगितलं जातं. यामुळे जळजळ होऊ शकते. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हे ऑईल कोणत्याही करिअर ऑईल (उदा. खोबरेल तेल) किंवा मॉइश्चरायझरमध्ये मिसळूनच वापरावे.
लॅव्हेंडर ऑईलमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-फ्लॉजिस्टीक गुणधर्म असतात. जे त्वचेच्या पेशींना आराम देतात. हे ऑईल चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही प्रभावी ठरते. हे ऑईल देखील मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून वापरावे. इसेन्शियल ऑईल्स अत्यंत तीव्र (Concentrated) असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य काळजी घेऊनच त्यांचा वापर करावा. मात्र हे तेल वापरल्याने त्याचा फरक दिसतो असा दावा केला जात आहे. पण हे वापरण्या आधी संबंधीतांचा सल्ला घेण्यास कधी ही विसरू नका. सल्ला घेतल्या शिवाय कोणते ही तेल वापरू नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world