Happy Mothers Day 2026 Wishes In Marathi: आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणजेच, 'आई' हे आत्म्याला ईश्वराशी जोडणारे माध्यम किंवा जिच्यात आत्म्याचा आणि ईश्वराचा संगम होतो, ती आई होय. थोडक्यात सांगायचे तर, जिच्या रूपात देव धरतीवर आला आहे, अशी ती 'आई. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान देवासमान आहे. आई इतकं निस्वार्थ प्रेम, माया कोणत्याच नात्यात नाही, म्हणूनच आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी कायम लहानच असतो.
दररोज आपल्या प्रत्येकासाठी झटणाऱ्या आईचाही दिवस असतो तो म्हणजे मातृदिन. मदर्स डे म्हणजे आपल्या आईसाठी प्रेम व्यक्त करण्याचा, तिला तिच्या त्यागासाठी अपार प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. आज मातृदिनानिमित्त तुम्हीही तुमच्या आईला सुंदर शब्दात शुभेच्छा द्या. ती आपल्यासाठी कायम खास असते अन् तिच्याशिवाय अख्ख आयुष्य अपूर्ण असतं अशा आपल्या आईला खास शब्दात शुभेच्छा द्या...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा| मातृदिन 2026| Mothers Day Wishesh 2026 | Happy Motheray Day 2026
1. आई म्हणजे...
आई म्हणजे देवाची मूर्ती,
आई म्हणजे मायेची सावली,
आई म्हणजे दुःखात आधार,
आई म्हणजे अमृताची गोडी...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2. प्रेमाचे प्रतीक...
हजारो प्रेम करणारे मिळतील,
पण आईसारखी कुणीच मिळणार नाही.
माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्तीला,
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मदर्स डे स्पेशल...
3. आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही जी हिशोब लावत नाही,
ती धन्य माऊली म्हणजेच आई..!
हॅपी मदर्स डे मम्मा..!
4. "आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..
तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. "
मातृ दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!
5. "आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा"
6. डोळे झोपेमुळे लाल आहेत की रडल्यामुळे,
हे जी लगेच ओळखते, ती आई असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. माझी ताकद...
आईच्या प्रेमाच्या बळावर,
मी सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद गोळा करतो.
Happy Mother's Day, Aai!