मुंबईकरांनो, तुम्ही खात असलेले आईस्क्रीम थेट हार्ट अटॅकला आमंत्रण तर देत नाही ना? तिशीमध्येच येतोय झटका

Ice cream vs frozen dessert Mumbai:अगदी वयाच्या 30 वर्षांमध्येच हृदयविकाराचा झटका येण्यामागे ही छुपी फसवणूक कारणीभूत असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ice cream vs frozen dessert :मुंबईमध्ये सध्या आईस्क्रीमच्या नावाखाली 'फ्रोजन डेझर्ट'ची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुंबई:

Ice cream vs frozen dessert Mumbai: उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटलं की आपण पटकन आईस्क्रीमचा कप किंवा कोन हातात घेतो. पण तुम्ही खात असलेले आईस्क्रीम खरोखरच दुधापासून बनलेले आहे की तुम्ही आईस्क्रीमच्या नावाखाली केवळ वनस्पती तेल पोटात ढकलत आहात, याचा कधी विचार केला आहे का? मुंबईमध्ये सध्या आईस्क्रीमच्या नावाखाली 'फ्रोजन डेझर्ट'ची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. 

दिसायला अगदी हुबेहूब आईस्क्रीमसारखेच दिसणारे हे फ्रोजन डेझर्ट आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात नकळतपणे होणारे हे पामोलीन ऑईलचे सेवन मुंबईकरांना थेट हृदयविकाराच्या दारात नेऊन उभे करत आहे. अगदी वयाच्या 30 वर्षांमध्येच हृदयविकाराचा झटका येण्यामागे ही छुपी फसवणूक कारणीभूत असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

काय आहे फरक?

आपण जे आवडीने खातो ते आईस्क्रीम आणि समोर येणारे फ्रोजन डेझर्ट यामध्ये नेमका काय फरक आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात फूड ऍनालिस्ट शीला गवळी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अस्सल आईस्क्रीम हे प्रामुख्याने शुद्ध दूध, दुधाची क्रीम आणि साखरेपासून बनवले जाते. 

दुधातील नैसर्गिक घटकांमुळे ते शरीराला हानी पोहोचवत नाही. याउलट, बाजारात मिळणारी सगळीच उत्पादने आईस्क्रीम नसतात. अनेक प्रसिद्ध कंपन्या दुधाऐवजी थेट पाम ऑइल म्हणजेच वनस्पती तेलाचा वापर करतात. या तेलाला विशिष्ट प्रक्रियेतून गोठवून जे तयार केले जाते, त्याला 'फ्रोजन डेझर्ट' म्हणतात. सर्वसामान्य माणूस या दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखू शकत नाही आणि फसवणुकीचा बळी ठरतो.

( नक्की वाचा : देशातील 7 कोटी महिला सोडणार नोकरी? धक्कादायक अहवालाने कॉर्पोरेट जगतात खळबळ! वाचा काय आहे कारण? )

असे ओळखा अस्सल आईस्क्रीम

अस्सल आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट दिसायला सारखे असले तरी ते खाताना आणि वितळताना त्यातील फरक सहज ओळखता येऊ शकतो. शुद्ध दुधापासून बनवलेले अस्सल आईस्क्रीम हे अतिशय गुळगुळीत आणि मऊ असते. 

जेव्हा तुम्ही ते खातात, तेव्हा ते तोंडात टाकल्या टाकल्या लगेच नाही वितळत, तर ते हळूहळू आणि अतिशय सुखदपणे वितळते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तोंडात दुधाची एक छान चव रेंगाळते.

Advertisement

याउलट, वनस्पती तेलापासून बनवलेले फ्रोजन डेझर्ट खाताना ते तोंडात थोडे चिकट किंवा तेलकट लागू शकते. सर्वात मोठी ओळख म्हणजे, जेव्हा फ्रोजन डेझर्ट वितळते, तेव्हा ते दुधासारखे एकत्र राहत नाही. ते वितळल्यानंतर त्याचे पाणी आणि तेल एकमेकांपासून वेगळे झाल्यासारखे स्पष्ट दिसते. तुमचे आईस्क्रीम वितळल्यावर पाणी सोडत असेल, तर समजा की तुम्ही आईस्क्रीम नाही तर तेल खात आहात.

खरेदी करताना या गोष्टी तपासा

आईस्क्रीम विकत घेताना पॅकेटवर काय लिहिले आहे हे बारकाईने वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही वस्तू घेताना त्यामध्ये कोणते घटक वापरले आहेत आणि त्यांचे प्रमाण किती आहे, हे तपासण्याची सवय लावून घेतली पाहिजे. नियमांनुसार, उत्पादनामध्ये पाम ऑइल किंवा वनस्पती तेलाचा वापर केला असेल, तर कंपन्यांना त्या पॅकेटवर 'फ्रोजन डेझर्ट' असे लिहिणे बंधनकारक असते. त्यामुळे पॅकेटवर 'आईस्क्रीम' हा शब्द लिहिला आहे की 'फ्रोजन डेझर्ट' हे सर्वात आधी पहा. घटकांच्या यादीत पाम ऑइल दिसले, तर ते आईस्क्रीम नाही हे स्पष्ट होते. याशिवाय त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण किती आहे, हे देखील आवर्जून पाहिले पाहिजे. आरोग्याशी तडजोड न करण्यासाठी ही सतर्कता बाळगणे आता आवश्यक झाले आहे.
 

Advertisement