नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट!

Navratri shopping in Mumbai : मुंबईतील मार्केटमध्ये सध्या नवरात्रीची लगबग सुरु आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:


Navratri shopping in Mumbai : नवरात्री उत्सव तोंडावर आला आहे. या उत्सवात देवीसमोर गरबा खेळला जातो. गरबा खेळण्यासाठी तरुणाई मोठ्या आतुरतेनं नवरात्रीची वाट पाहात असते. गरब्या खेळण्यासाठी आकर्षक घागरा चोळी तसंच जॅकेट तर हवेच. त्याचबरोबर आपली वेशभूषा इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळात सौंदर्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, घागरा चोळी स्पर्धा ठेवल्या जातात. 

या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तसंच गरब्यात धमाल करण्यासाठी मुली घागरा चोळी आणि मुलं कुडते आणि मोदी जॅकेट याला पसंती देतात हा गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेंड आहे. हे सर्व ट्रेंड फॉलो करत असताना बजेटचाही विचार करावाच लागतो. अनेकदा बजेटमुळे नवरात्रीमधील गरब्याचा आनंद आखडता घेण्याची वेळ तरुणांवर येते. पण, आता असं करण्याची गरज नाही. कारण मुंबईत नवरात्रीसाठी अगदी स्वस्त किंमतीमध्ये घागरा चोळी मिळत आहेत. विशेष म्हणजे त्याची किंमत 400 रुपयांपासून सुरु असल्यानं हे स्वस्त आणि मस्त ठिकाण तुम्हाला माहितीच हवं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठं मिळतात ड्रेस?

मुंबईतील भुलेश्वर मार्केट कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. लग्न समारंभ असो किंवा अन्य कोणताही प्रसंग मुंबईकरांची इथं नेहमीच खरेदीसाठी गर्दी असते. भुलेश्वर मार्केट सध्या नवरात्रीसाठी सज्ज झालं आहे. नवरात्रीच्या कपड्यांनी हे मार्केट सजलंय. कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या घागरे चोळी, कुडते खरेदीसाठी तरुणांनी मोठी गर्दी केली आहे. 

कशाला पसंती?
 
कॉटन घागरे घेण्याकडे तरुणींचा अधिक कल असल्याची माहिती येथील दुकानदारांनी दिली. या ड्रेसमध्ये गरबा खेळणं सोपं जातंय. कॉटनच्या घागऱ्यांना घेर देखील अधिक असतो. त्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात. इतकंच नाही तर घागऱ्यामध्ये गरमही होत नाही. 400 रुपयांपासून या घागऱ्यांची किंमत सुरु होते. 

सॅटीन प्लस कॉटन हे मिक्स कापड घागऱ्यामध्ये उपलब्ध आहे.. या घागऱ्याची किंमत  400 रुपयांपासून 4000 हजार पर्यंत आहे. त्यावर हाताने बनवलेली सुंदर डिझाईन्स देखील आहेत.

( नक्की वाचा : 99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च )
 

जॅकेट 

काही जण नुसते जॅकेट घालणे देखील पसंत करतात. या जॅकेटवर कच्छी वर्क करण्यात आले आहे. हाताने विणलेली धाग्यांची डिझाईन , आरसे , गोंडे यामुळे हे जॅकेट अधिक सुंदर दिसतात. हे जॅकेट प्लेन आणि लाईट रंगाच्या टॉप वर तुम्ही घालू शकता. या जॅकेटची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते. 

धोती 

कुडता - धोती महिला आणि पुरुषांसाठी उपलब्ध आहे. त्यावर देखील हातांनी विणलेली सुंदर डिझाईन्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. धोती कुडत्याची किंमत 800 ते 3000 रुपयांपर्यंत आहे. डिजाईन जितकी बारीक तशी त्यावरील किंमत वाढते, अशी माहिती दुकानदारांनी दिली.