
Coldplay Concert 2025 : संपूर्ण देशभरातील फॅन्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करत आहेत, तो कोल्डप्ले म्युझिक इव्हेंट शनिवारी (18 जानेवारी) होत आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची सर्व तिकीटं केंव्हाच विकली गेली आहेत. तसंच त्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेमध्येही मोठा बदल करण्यात आलाय. तसंच या भागातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.
सोशल मीडिया, ऑफिस, शाळा किंवा कॉलेज प्रत्येक ठिकाणी कोल्डप्लेची चर्चा आहे. कोल्डप्ले हा एक कार्यक्रम असून त्याच्या तिकीटांची किंमत लाखांमध्ये आहे, असं सांगितलं जातं. पण तुम्हाला कोल्डप्ले म्हणजे काय हे माहिती आहे का? सोशल मीडियावर सुरु असलेले मीम्स आणि ट्रेंड्स पाहून तुम्हालाही याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. पण, हे सर्व वाचणार कुठं? असा प्रश्न पडला असेल तर काळजी करु नका, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कोल्डप्ले?
कोल्डप्ले हा एक ब्रिटीश रॉक बँड आहे. या बँडची सुरुवात 1997 साली लंडनमध्ये झाली. हा बँड त्यांचे कार्यक्रम लाईव्ह करतो. जॉनी बकलँड, ख्रिस मार्टिन, गाय बेलिमॅन आणि विल चॅम्पियन हे या बँडचे सदस्य आहेत. फिल हार्वी या ग्रुपचा मॅनेजर आहे. आपली कला म्हणजे लोकप्रिय संस्कृतीवर प्रभाव टाकते, असा त्यांचा दावा आहे.
इंटरनेटवर चर्चा का?
जवळपास 9 वर्षांनंतर कोल्डप्ले बँडचा भारतामध्ये कार्यक्रम होत आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्याच्या तिकीटंाची 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजचा ऑनलाईन विक्री सुरु झाली. पण, बुकिंगच्या काही वेळांपूर्वीच वेबसाईट क्रॅश झाली. त्यामुळे अनेक फॅन्स निराश झाले. थोड्यावेळानं सर्व्हर नीट झालं. पण, तिकीटांची मागणी प्रचंड होती. त्यामुळे 21 जानेवारी 2025 रोजी आणखी एक शो होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं.
तिकीटासाठी प्रचंड चढाओढ
या कार्यक्रमासाठी सुरुवातीला तिकीटाची किंमत 2,000 ते 35,000 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आले आहेत. पण थोड्याच वेळात Viagogo सारख्या रिसेल प्लॅटफॉर्मवर या तिकीटाचे दर 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. या प्लॅटफॉर्मवर 12,500 रुपयाचं तिकीट 3 लाख 36 हजारांपेक्षा जास्त किंमतीमध्ये विक्री होत आहे. तर 6,450 रुपयांचं स्टँडिंग तिकीट 50, 000 रुपयांना विकलं जात आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल 99 लाख वेटिंगला असल्याचीही माहिती आहे.
( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
कोल्डप्लेचं इंडिया कनेक्शन
रॉकबँड कोल्डप्लेचा एक व्हिडिओ 'हिम फॉर द वीकेंड' 2016 साली प्रदर्शित झाला. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोनम कपूर काही सेकंद दिसली होती. या व्हिडिओमध्ये भारतामधील वेगवेगळी संस्कृती दिसली होती. या व्हिडिओची सुरुवात एका मंदिरातील आरतीनं होती. त्यानंतर भारतीय जीवनशैली, ऐतिहासिक इमारती आणि सणांना यामध्ये दाखवण्यात आले आहे. संपूर्ण जगभर हा व्हिडिओ लोकप्रिय झाला होता.
गगनाला भिडले दर
कोल्डप्ले कार्यक्रम 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. या कार्यक्रमाचा मोठा फायदा जवळच्या हॉटेल्सना होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार काही हॉटेलचे या काळातील तीन रात्रीचे दर 5 लाखांच्याही पुढं गेले आहेत. मुंबईत यापूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांना कोल्डप्लेनं मागं टाकलं आहे. जवळपासची अनेक हॉटेल या काळात बुक झाल्याची माहिती बुकिंग अॅपमध्ये मिळत आहे.
( नक्की वाचा : Abrosexuality : तुम्ही देखील Abrosexual आहात का? जगभर चर्चेत असलेली काय आहे ही लैंगिक ओळख? )
'मेक माय ट्रिप' नुसार स्टेडियमच्या जवळचे 'कोर्टयार्ड बाय मॅरिएट' आणि 'ताज विवांता' या हॉटेलमध्ये त्या तीन दिवसात एकही रुम सध्या उपलब्ध नाही. फार्च्यून सेलेक्ट एक्सोटिका या हॉटेलममध्ये तीन दिवसांसाठी 2.45 लाख रुपये वसूल रुपयांचा चार्ज लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर स्वस्त आणि थ्री स्टार हॉटेलचे दरही वाढले आहेत. त्याचबरोबर आत्तापासूनच विमानाच्या तिकीटांचे दरही वाढले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world