Sarcopenic Obesity: टाइप-2 डायबिटीजचा (मधुमेहाचा) धोका केवळ शरीराच्या वाढलेल्या वजनाशी किंवा लठ्ठपणाशीच जोडलेला नाही, तर स्नायूंचे आरोग्यही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात केलेल्या एका संशोधनातील माहितीनुसार, ज्या लोकांमध्ये शरीरावरील अतिरिक्त चरबीसोबतच स्नायूंची कमकुवतपणा असतो, त्यांना डायबिटीजचा धोका खूप जास्त असतो. हे संशोधन जगातील प्रमुख डायबिटीज जर्नल्सपैकी एक असलेल्या 'डायबिटीज केअर'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या अभ्यासामध्ये कर्टिन स्कूल ऑफ पॉप्युलेशन हेल्थ आणि कर्टिन एनेबल इन्स्टिट्यूटच्या डिमेंशिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या संशोधकांनी सुमारे 4.8 लाख प्रौढांच्या आरोग्यविषयक आकडेवारीचे 14 वर्षांपर्यंत विश्लेषण केले. संशोधनात समाविष्ट असलेले सर्व लोग सुरुवातीला डायबिटीजमुक्त होते.
सार्कोपेनिक ओबेसिटी म्हणजे काय आणि त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका किती पटीने वाढतो? / What is sarcopenic obesity and how much does it increase diabetes risk?
संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांमध्ये लठ्ठपणा आणि स्नायूंची कमकुवतपणा हे दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात होते, त्या स्थितीला 'सार्कोपेनिक ओबेसिटी' (Sarcopenic Obesity) म्हटले जाते. अशा लोकांमध्ये निरोगी शरीररचना असलेल्या लोकांच्या तुलनेत टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका साडेतीन पटीपेक्षाही जास्त असल्याचे आढळून आले. अभ्यासानुसार सार्कोपेनिक ओबेसिटीने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये केवळ लठ्ठपणा असलेल्या लोकांच्या तुलनेत टाइप-2 डायबिटीजचा धोका 19 टक्के अधिक होता. तर दुसरीकडे ज्यांच्यामध्ये केवळ स्नायूंचे प्रमाण कमी आहे किंवा कमकुवतपणा आहे (सार्कोपेनिक), त्यांच्या तुलनेत हा धोका 91 टक्के जास्त असल्याचे आढळले.
(नक्की वाचा: Gut Health: पोट स्वच्छ होत नाहीय? त्वचेवरही ग्लो नाहीय? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक)
केवळ वजन किंवा बीएमआय पाहणे पुरेसे नाही, स्नायूंच्या ताकदीकडे लक्ष देणे गरजेचे / Just checking weight or BMI is not enough, muscle strength matters
या संशोधनाचे मुख्य लेखक आणि पीएचडी संशोधक झोंगयांग गुआन यांनी सांगितले की, हे निष्कर्ष 'डायबिटीजचा धोका प्रामुख्याने शरीराच्या वजनावरूनच ठरतो' या समजूतीला आव्हान देतात. गुआन म्हणाले की, अतिरिक्त वजन हे डायबिटीजचे एक मोठे कारण नक्कीच आहे, पण स्नायूंचे आरोग्यही हा धोका समजून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या लोकांमध्ये अधिक चरबी आणि कमी स्नायू हे दोन्ही असतात, त्यांच्यात डायबिटीजचा धोका केवळ लठ्ठपणा असलेल्या लोकांपेक्षा खूप जास्त असतो. म्हणूनच डायबिटीजच्या धोक्याचे मूल्यांकन करताना केवळ वजन किंवा बॉडी मास इंडेक्स (BMI) पाहण्याऐवजी स्नायूंची ताकद आणि त्यांच्या प्रमाणावरही लक्ष देणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: Blanched Almond: सावधान! सालीसकट बदाम खाताय? उकडलेले बदाम खाल्ल्यास काय होईल? जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे)
महिला आणि तरुणांमध्ये जास्त धोका, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायामाचा सल्ला / Higher risk in women and younger adults, exercise recommended for muscle health
संशोधनात हे देखील समोर आले आहे की, सार्कोपेनिक ओबेसिटी असलेल्या सुमारे 15 टक्के लोकांमध्ये 10 वर्षांच्या आत टाइप-2 डायबिटीज विकसित झाला, तर लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण सुमारे 11 टक्के आणि निरोगी शरीररचना असलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण केवळ 3 टक्के होते. हा संबंध महिलांमध्ये आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रौढांमध्ये अधिक असल्याचे या अभ्यासात दिसून आले. संशोधनाचे वरिष्ठ प्रमुख प्राध्यापक मारियो सिएर्वो यांनी सांगितले की, डायबिटीज होऊ नये यासाठी शरीराच्या वजनासोबतच स्नायूंच्या आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. वाढते वय आणि लठ्ठपणाचा वाढता आलेख लक्षात घेता, नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून स्नायू मजबूत ठेवल्यास टाइप-2 डायबिटीजचा धोका कमी करण्यात मोठी मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
(Content Source IANS)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )