'हे' 5 उपाय केल्यास तुमच्या जवळपासही फिरकणार नाही डेंग्यूचा डास

How to prevent from Dengue : तुम्हाला कधीही डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून 5 सोप्या उपायांची नक्की अंमलबजावणी करा.

Advertisement
Read Time: 2 mins
National Dengue Day : 'या' गोष्टींची खबरदारी घेतल्यास कधीही डेंग्यू होणार नाही.

National Dengue Day 2024: डास चावल्यामुळे होणारा डेंग्यू हा एक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी लाखो जणांना डेंग्यूची लागण होते. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भानव रोखण्यासाठी त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी 16 मे रोजी नॅशनल डेंग्यू डे  (National dengue day 2024)  साजरा केला जातो. डेंग्यूच्या लक्षणांची सर्वांना माहिती देणे, त्याबाबत जागरुकता करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. तुम्हाला कधीही डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून पाच सोपे उपाय  (How to prevent from dengue) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कपड्यांची खबरदारी

घरातून संध्याकाळी बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. फुल स्लीव्हचा शर्ट किंवा कुर्ता घाला. लांब पँट, मोजे आणि बुट घाला. चप्पल किंवा सँडल घालणं टाळा.

मच्छरदानीचा वापर

डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रात्री मच्छरदानीमध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फक्त डासच नाही तर अन्य किड्यांपासूनही तुमचं संरक्षण होतं. 

( नक्की वाचा : नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण )
 

लिंबू आणि निलगिरीचा वापर

लिंबाचा रस आणि निलगिरी तेल एकत्र करुन त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि त्याचा स्प्रे घरात मारा. त्यामुळे डास पळून जातात. लेमन लेमन यूकेलिप्टस एसेंशियल ऑईलचा वास डासांना आवडत नाही. त्यामुळे ते जिथं शिंपडलं जातं तिथ डास फिरकत नाहीत. 

कचरा आणि अस्वच्छ पाणी जमा होऊ देऊ नका

घरामध्ये एखाद्या ठिकाणी जास्त काळ पाणी साचलं असेल तर तिथं डेंग्यूचे डास गोळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतंही भांड, कुलर किंवा पिपात पाणी जास्त काळ साचू देऊ नका. टाकीमधील पाणी देखील 15 ते 20 दिवसांमध्ये साफ करा. 

Advertisement

( नक्की वाचा : मेस्सी, रोनाल्डोच्या तोडीचा रेकॉर्ड असलेल्या सुनील छेत्रीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य )
 

मॉस्किटोरेपेलेंटचा करा वापर

डेंग्यूचे डास हे दिवसा जास्त सक्रीय असतात असं तज्ज्ञ सांगतात. गुडघ्याच्या खाली हे डास चावा घेतात अशीही माहिती आहे. त्यामुळे बाहेर जाताना फुल कपडे घाला आणि मॉस्किटो रेपलेंटचा वापर करा. 

Topics mentioned in this article