Sunil Chhetri Fitness: महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं निवृत्तीची घोषणा केली. तो 6 जून रोजी कुवेत विरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. छेत्रीनं मार्च महिन्यात भारताकडून 150 वा सामना खेळला होता. 2005 साली पदार्पण करणाऱ्या छेत्रीनं भारतासाठी आत्तापर्यंत 94 गोल केले आहेत. तो भारताचा टॉप स्कोरर आणि सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. सक्रीय खेळाडूंमध्ये गोल करणाऱ्यांच्या यादीत तो ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सीनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मैदानामध्ये कुशल आणि प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या चाली रचणे हे सुनील छेत्रीचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर त्याचा फिटनेस अनेक खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. छेत्रीनं नेहमीच फिटनेसवर लक्ष दिलं. त्यामुळे कोणत्या तरुण खेळाडूच्या तोडीचा त्याचा फिटनेस आहे. प्रत्येक खेळाडूला यशस्वी होण्यासाठी फिटनेस आणि डाएटची शिस्त पाळणे आवश्यक असते. सुनील छेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय खात असे तसंच त्याच्या वर्कआऊटचं वेळापत्रक काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसीार छेत्रीला स्पीड ट्रेनिंग ड्रिल करायला आवडतं. त्याचबरोबर तो हाय इंटेसिटी वर्कआऊट करतो. फुटबॉलपटूसाठी हा आवश्यक व्यायाम आहे. सुनील छेत्री आठवड्यातून सहा दिवस ट्रेनिंग घेतो. मांडी, स्नायू पोट तसंच खांद्याचे व्यायामावरही छेत्रीचा विशेष भर असतो.
जिममध्ये वर्क आऊट करण्याबरोबरच छेत्रीला सायकल चालवणे देखील आवडते. त्यामुळे पाय चांगल्या शेपममध्ये राहण्यास मदत मिळते तसंच त्याचा स्टॅमिना वाढतो. छेत्रीला पोहायला देखील आवडतं. सहकारी खेळाडूंसोबत तो अनेकदा पुलमध्ये पोहण्यासाठी उतरतो. त्यामुळे त्याला ताजतवाणं राहण्यास मदत मिळते.
( नक्की वाचा : RCB ला प्ले ऑफ गाठण्यासाठी CSK नाही तर 'हा' आहे अडथळा )
छेत्रीचा डाएट प्लॅन
कोणत्याही खेळाडूसाठी डाएट प्लॅन महत्त्वाचा असतो. सुनील छेत्री देखील निरोगी आणि फिट राहण्यासाठी योग्य डाएट काटेकोरपणे पाळतो. मीडिया रिपोर्टनुसार तो सकाळी उठल्यानंतर सकाळी पहिल्यांदा पाणी पितो. त्यामुळे त्याच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतं आणि बॉडी हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
छेत्रीचा ब्रेकफास्ट काय असतो?
मीडिया रिपोर्टनुसार सुनील छेत्री ट्रेनिंग करण्यापूर्वी थोडं खातो. त्यामध्ये काजू, लापशी, उकडलेले अंडे आणि ताजे ज्यूस यांचा समावेश असतो. एक तास जोरदार व्यायाम केल्यानंतर छेत्री हेवी नाश्टा करतो. त्यामध्ये ब्राऊन ब्रेड, ब्रोकोली, छोले, सुशी, ऑलिव्ह, ट्यूना, मासे आणि रेड मीट यांचा समावेश असतो.
सुनील छेत्रीचा लंच
सुनील छेत्रीच्या जेवणात पाले भाज्या, उकडलेल्या भाज्या, मासे, चिकन स्टेक आणि आणखी एखादी प्लेट असते.
( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )
सुनील छेत्रीचा डिनर
सुनील छेत्रीचं रात्रीचं जेवण साधं असतं. त्यामध्ये रोटी, डाल, एक वाटी भाजी, चिकन/मासे/पनीर यांचा समावेश असतो. तो झोपण्यापूर्वी प्रोटीन शेक घेतो.
( स्पष्टीकरण : ही सामान्य ज्ञानावर अधारित माहिती आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित विषायातील तज्ज्ञ तसंच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 'NDTV मराठी' या माहितीला जबाबदार असल्याचा दावा करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world