Kidney Detox Drinks: घरच्याघरीच किडनी डिटॉक्स करण्यासाठी डाएटमध्ये 5 ड्रिंक्सचा करा समावेश, हे होतील परिणाम?

Kidney Detox Drinks: किडनीतील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यासाठी कोणत्या ड्रिंक्सचा डाएटमध्ये समावेश करावा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Kidney Detox Drinks: किडनी डिटॉक्स ड्रिंक्स"
Canva

Kidney Detox Drinks: किडनी हा (Kidney Health) हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किडनीचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल, तर या पेयांचे सेवन नक्की करा.

किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवावर परिणाम करणारे घटक, आजार आणि किडनी निरोगी ठेवण्याबाबत लोकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.  

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचा डाएटमध्ये समावेश करावा? (Which Drinks To Consume For Healthy Kidneys)

1. लिंबू पाणी (Lemon Water): किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. यामध्ये सायट्रिक ॲसिड असते, जे किडनीमध्ये खडे (Stone) तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. हे लघवीतील सायट्रेटची पातळी वाढवते, ज्यामुळे निरोगी पीएच पातळी राखण्यास मदत होऊ शकते.

Advertisement

Photo Credit: NDTV Marathi

2. ग्रीन टी (Green Tea): ग्रीन टी अँटी-ऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असते. जे किडनीच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करते. किडनीचे एकंदरीत आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराला अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा होणे आवश्यक आहे. 

3. क्रॅनबेरी ज्युस (Cranberry Juice): क्रॅनबेरी ज्युस युटीआयची समस्या (UTI - मूत्रमार्ग संसर्ग) रोखण्यासाठी मदत करू शकतो, या संसर्गाचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो.

4. बीट ज्युस(Beetroot Juice): बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास आणि किडनी डिटॉक्स (विषारी घटक बाहेर काढण्यास) करण्यास मदत करतात.

Photo Credit: NDTV Marathi

5. हर्बल टी (Herbal Tea): आले, पुदिना किंवा जास्वंद (Hibiscus) यापासून तयार केलेला हर्बल चहा किडनी निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.

Advertisement

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)