Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, घराबाहेर पडावं की पडू नये? दुर्लक्ष करू नका वाचा माहिती

Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ महत्त्वाचा आहे? या काळादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या अन्यथा...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ महत्त्वाचा, कारण..."
Envato

Nautapa 2026: नवतपा म्हणजे नऊ दिवस वातावरणात प्रचंड उष्णता जाणवते. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हा काळ सुरू होतो. यंदा नवतपाची सुरुवात 25 मेपासून ते 2 जून रोजीपर्यंत आहे. या नऊ दिवसांत भीषण उष्णतेपासून (Heatwave) स्वतःचा बचाव कसा करावा? याबाबत लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

नवतपादरम्यान उन्हाळा अधिक रौद्र रुप धारण करतो. वर्ष 2026मध्ये नवतपा कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी न घेतल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

Advertisement

नवतपा 2026 कधीपासून आहे? | Navtapa 2026 Duration 

यंदा नवतपा 25 मेपासून ते 2 जूनपर्यंत असणार आहे. या नऊ दिवसांत शरीर थंड आणि हायड्रेटेड कसे ठेवायचे, याबाबत माहिती जाणून घेऊया...

उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाय 

1. उन्हात घराबाहेर जाणे टाळा: जीवघेण्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लहान मुले आणि वृद्धांना घराबाहेर जाऊ देऊ नका. जास्त तापमानात घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते.

2. हायड्रेशन महत्त्वाचे: शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, कैरीचे पन्हे आणि नारळ पाणी यासारख्या द्रवपदार्थांचा आहारात समावेश करावा. तहान लागण्याची वाट पाहू नका; दर 30 मिनिटांनी एखादे पेय किंवा पाणी प्यावे. 

3. पातळ कपडे: पातळ सूती कपडे परिधान करावे. वजनाने हलके, फिकट रंगाचे, सैल कपडे परिधान करावे; यामुळे शरीरावर रॅशेज येणार नाहीत.  

Advertisement

4. घर थंड ठेवावे: उन्हाळ्यात खिडक्यांवर पडदे लावा, जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाश घरात येणार नाही. रात्रीच्या वेळेस खिडक्या उघड्या ठेवाव्या, म्हणजे घरात थंड हवा येईल. पंखा किंवा कुलरमुळेही घराचे तापमान थंड राहण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Chemically Ripen Watermelons: रसाळ कलिंगड हवे की विष? केमिकलयुक्त कलिंगड ओळखण्यासाठी 5 टिप्स)

नवतपा म्हणजे काय आणि हा काळ धोकादायक का मानला जातो?

नवतपा हा वर्षातील तो काळ आहे जेव्हा वातावरणात उष्णता अत्यंत तीव्र असते. या काळात सामान्य दिवसांपेक्षा तापमान खूप जास्त असते आणि हवेतील आर्द्रता कमी होते. उष्णतेचा शरीरावर वेगाने परिणाम होऊ शकतो, यामुळेच नवतपाचा काळ अधिक धोकादायक मानला जातो तसेच उष्माघाताचाही धोका वाढतो

Advertisement

नवतपा 2026मध्ये उष्णता किती वाढू शकते?

नवतपा 2026दरम्यान जास्त प्रमाणात उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दुपारच्या वेळेस जास्त प्रमाणात ऊन, उष्ण हवेमुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची समस्या निर्माण होऊ शकते. दरम्यान प्रत्येक क्षेत्रातील परिणाम वेगवेगळे असू शकतात, यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.   

(नक्की वाचा: Injected Vegetables Test: भाजी नाही तुम्ही विष विकत घेताय, 5 मिनिटांत 5 ट्रिक्सने ओळखा इंजेक्शन आणि केमिकलयुक्त भाज्या)

नवतपाच्या काळात आरोग्याला काय धोका असतो? 

नवतपादरम्यान घामाद्वारे शरीरातील पाणी आणि आवश्यक खजिने वेगाने बाहेर फेकले जातात. योग्य पोषण न मिळाल्यास शरीराचे तापमान संतुलित ठेवणे कठी होते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे, डिहायड्रेशन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तीव्र सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिल्याने हा धोका विशेषतः वाढतो.

नवतपादरम्यान खाण्यापिण्याची कोणती काळजी घ्यावी?

नवतपादरम्यान आहारामध्ये पचनास हलक्या आणि थंड स्वरुपातील खाद्यपदार्थांचा समावेश करावा.   

नवतपाचा काळ शरीरासाठी धोकादायक का?

नवतपादरम्यान घामाद्वारे शरीरातील पाणी आणि खनिजे वेगाने बाहेर पडतात. योग्य पोषण न मिळाल्यास शरीराचे तापमान संतुलित ठेवणे कठीण होते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit: NDTV Marathi

खाण्यापिण्याबाबत काय काळजी घ्यावी?

  • दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.
  • कलिंगड, टरबूज यासारख्या मोसमी फळांचा आहारात समावेश करा.
  • तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळा.
  • उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा.
  • ताक, दही आणि लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरेल.

कोणी काळजी घ्यावी?

नवतपादरम्यान लहान मुले, वयोवृद्ध, रुग्ण, उन्हात काम करणाऱ्या लोकांनी आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.  

नवतपामध्ये घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी?

उन्हात बाहेर पडताना डोके झाकावे, हलके-सैल कपडे परिधान करावे, स्वतःसोबत पाण्याची बाटली ठेवा आणि आवश्यकता नसेल तर दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)