- 25 मे 2026 रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि नौतपा हा तीव्र उष्णतेचा 9 दिवसांचा कालावधी सुरू होईल
- रोहिणी नक्षत्राचा स्वामी सूर्य असून या काळात सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडून तापमानात मोठी वाढ होते
- नौतपा हा काळ मान्सूनचा गर्भकाल मानला जातो आणि उष्णतेच्या तीव्रतेनुसार पुढील पावसाळ्याचा दर्जा ठरतो
Nautapa 2026: उन्हाळी हंगामातील सर्वात उष्ण दिवसांचा कालावधी मानल्या जाणाऱ्या 'नवतपा'ची (नौतपा) सुरुवात आजपासून (25 मे) होणार आहे. सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार असल्यामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडणार आहेत. या काळात पुढचे नऊ दिवस म्हणजेच 2 जूनपर्यंत उष्णतेचे तीव्र स्वरुपात चटके बसू शकतात.
25 मे पासून नौतपाचा प्रारंभ | Commencement of Nautapa from May 25
प्रसिद्ध ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजून 43 मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. या विशिष्ट क्षणापासूनच वर्षातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 'नौतपा' सुरू होईल. हा तीव्र उष्णतेचा कालखंड 2 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. या काळात सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडत असल्याने तापमानात कमालीची वाढ होणार आहे.
सूर्य आणि चंद्राच्या नक्षत्राचा संयोग | Conjunction of Sun and Rohini Nakshatra
ज्योतिषशास्त्रानुसार रोहिणी नक्षत्राचा स्वामी 'सूर्य' असून हा अग्नितत्त्वाचा प्रमुख ग्रह आहे. जेव्हा उष्णतेचा कारक असलेला सूर्य चंद्र मालकीच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा हा संयोग पृथ्वीवरील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढवतो. यामुळेच या नऊ दिवसांच्या कालावधीत उन्हाचा पारा टोकावर पोहोचतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.
(नक्की वाचा : Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा, घराबाहेर पडावं की पडू नये? दुर्लक्ष करू नका वाचा माहिती)
लोकमान्यतेनुसार नौतपा हा केवळ उन्हाचा काळ नसून तो मान्सूनचा 'गर्भकाल' मानला जातो. जुन्या जाणत्या लोकांच्या आणि हवामान अंदाजाच्या पारंपरिक समजुतीनुसार, हे नऊ दिवस जितके जास्त तापतील आणि पृथ्वी जेवढी जास्त धगधगेल, तेवढाच पुढील येणारा पावसाळा चांगला होतो.
(नक्की वाचा : निसर्गाची अग्निपरीक्षा! देशातल्या या राज्यात 50°C पार पोहोचला होता पारा, तेव्हाची स्थिती ऐकून अंगावर येईल काटा)
रोहिणी नक्षत्र गळणे' म्हणजे काय? | Understanding 'Rohini Nakshatra Galne
जर या नऊ दिवसांच्या तीव्र उष्णतेच्या काळात अचानक पाऊस पडला, तर ज्योतिषशास्त्रात त्याला "रोहिणी नक्षत्र गळणे" असे म्हटले जाते. नवतपाच्या काळात पाऊस पडल्यास मान्सूनच्या पुढील चक्रावर त्याचा परिणाम होतो, अशीही एक धारणा आहे.
8 जूनपासून मान्सूनच्या हालचाली | Monsoon Updates from June 8
नवतपाचा हा नऊ दिवसांचा टप्पा 2 जून रोजी पूर्ण झाल्यानंतर 8 जून 2026 रोजी सूर्यदेव मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करतील. भारतीय परंपरेनुसार मृगशिरा नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थाने मान्सूनच्या हालचालींना गती मिळते आणि पावसाचे आगमन होते. याच कारणामुळे भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषी संस्कृतीत नौतपाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)