
Navratri Colours 2024: शारदीय नवरात्रोत्सवास यंदा 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवास 'शारदीय नवरात्रोत्सव' असे म्हणतात. नऊ दिवस दुर्गामातेच्या रुपांची मनोभावे पूजा केली जाते. भाविक नऊ दिवस उपवास करतात आणि घटस्थापनेसह देवीच्या मूर्तीची स्थापनाही करतात. नऊ दिवस देवीची सकाळी-संध्याकाळी पूजाअर्चना, आरती केली जाते. नऊ दिवस देवीला विविध स्वरुपातील नैवेद्य देखील अर्पण केला जातो. नवरात्रोत्सवामध्ये (Navratri 2024) नऊ दिवस नऊ रंगांचे पोशाख परिधान करण्यासही विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाने दुर्गामातेची पूजा करावी आणि या रंगांचे महत्त्व काय आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
3 ऑक्टोबर 2024, गुरुवार - पिवळा रंग
पिवळा रंग हा आशावादी आणि आनंदाचे प्रतीक आहे.

Photo Credit: Alia Bhatt Instagram
4 ऑक्टोबर 2024, शुक्रवार - हिरवा रंग
हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा प्रगती, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. हिरवा रंग आयुष्यातील नवीन सुरुवातही दर्शवतो.

Photo Credit: Priya Bapat Instagram
5 ऑक्टोबर 2024, शनिवार - राखाडी रंग
राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे.

Photo Credit: Amruta Khanvilkar Instagram
6 ऑक्टोबर 2024, रविवार - नारिंगी रंग
केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्यास ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती येऊ शकते. केशरी रंग हा सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक आहे.

Photo Credit: Priya Bapat Instagram
7 ऑक्टोबर 2024, सोमवार - पांढरा रंग
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करतो.

Photo Credit: Pooja Sawant Instagram
8 ऑक्टोबर 2024 मंगळवार - लाल रंग
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

Photo Credit: Prajaktta Mali Instagram
9 ऑक्टोबर 2024 बुधवार - निळा रंग
निळा रंग वापरल्यास अतुलनीय आनंदाची अनुभूती येऊ शकते. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो.

Photo Credit: Sonalee Kulkarni Instagram
10 ऑक्टोबर 2024 गुरुवार - गुलाबी रंग
गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी महाष्टमी आहे, देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन देखील करणे शुभ असते.

Photo Credit: Sayali Sanjeev Instagram
11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार - जांभळा रंग
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीचे प्रतीक मानला जातो. या रंगामुळे भाविकांना सुख-समृद्धी मिळते, असे मानले जाते.
12 ऑक्टोबर शनिवार - मोरपंखी रंग
मोरपंखी रंगामुळे जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळते, असे म्हणतात.

Photo Credit: Pooja Sawant Instagram
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world