Navratri 2025 Date: नवरात्रौत्सव कधी आहे? तिथी, घटस्थापना, शुभ मुहूर्त, 9 रंग आणि त्यांचे महत्त्व जाणून घ्या

Shardiya Navratri 2025 Date: यंदा शारदीय नवरात्रौत्सवास कधीपासून शुभारंभ होतोय? नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत? दसरा कधी आहे? सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
Navratri 2025 Date And Time: नवरात्रौत्सव 2025 कधीपासून सुरू होत आहे?

Shardiya Navratri 2025 Date And Time: महिषासूर राक्षसाच्या नाश करण्यासाठी अवतार घेणार्‍या माता दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये नवरात्रौत्सव (Navratri 2025) उत्साहात साजरा केला जातो. नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. यंदा शारदीय नवत्रौत्सवास कधी सुरुवात होतोय, तिथी, नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व या सर्व माहिती जाणून घेऊया... 

नवरात्रौत्सव 2025 कधी आहे? (Shardiya Navratri 2025 Date)

यंदा नवरात्रौत्सवास 22 सप्टेंबरपासून शुभारंभ होतोय. याच दिवशी घटस्थापना केली जाईल.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Navratri 2025 Ghatasthapana Muhurat)

22 सप्टेंबर 2025

  • शुभ मुहूर्त : सकाळी 6.09 वाजेपासून ते सकाळी 8.06 वाजेपर्यंत आहे.
  • अभिजित मुहूर्त : सकाळी 11.49 वाजेपासून ते दुपारी 12.38 वाजेपर्यंत आहे.

नवरात्रौत्सव तिथी (Shardiya Navratri 2025 Tithi)

आश्विन शुद्ध प्रतिपदा (22 सप्टेंबर) ते आश्विन शुद्ध नवमी.

नऊ रात्रीचे नऊ रंग आणि रंगाचे महत्त्व (Shardiya Navratri 2025 Date And Color List)

22 सप्टेंबर 2025, सोमवार, पांढरा रंग (प्रतिपदा तिथी) | Navratri 2025 First Day White Color 

Photo Credit: Sayali Sanjeev Instagram

23 सप्टेंबर 2025, मंगळवार, लाल रंग (द्वितीया तिथी) | Navratri 2025 Second Day Red Color 

Photo Credit: Sonalee Kulkarni Instagram

24 सप्टेंबर 2025, बुधवार, निळा रंग (तृतीया तिथी) | Navratri 2025 Third Day Royal Blue Color 

Photo Credit: Priya Bapat Instagram

25 सप्टेंबर 2025, गुरुवार, पिवळा रंग (तृतीया तिथी) | Navratri 2025 Fourth Day Yellow Color 

Photo Credit: Madhuri Dixit Instagram

26 सप्टेंबर 2025, शुक्रवार, हिरवा रंग (चतुर्थी तिथी) | Navratri 2025 Fifth Day Green Color 

Photo Credit: Hruta Durgule Instagram

27 सप्टेंबर 2025, शनिवार, राखाडी रंग (पंचमी तिथी) | Navratri 2025 Sixth Day Grey Color 

Photo Credit: Hruta Durgule Instagram

28 सप्टेंबर 2025, रविवार, केशरी रंग (षष्टी तिथी) | Navratri 2025 Seventh Day Orange Color 

Photo Credit: Priya Bapat Instagram

29 सप्टेंबर 2025, सोमवार, मोरपंखी रंग (सप्तमी तिथी) | Navratri 2025 Eighth Day Peacock Green Color 

Photo Credit: Shruti Marathe Instagram

30 सप्टेंबर 2025, मंगळवार, गुलाबी रंग (महाअष्टमी तिथी) | Navratri 2025 Ninth Day Pink Color 

Photo Credit: Sonalee Kulkarni Instagram

नवरात्रीच्या नऊ रंगाचे महत्त्व | Navratri 2025 9 Colors| Shardiya Navratri 2025 Colors Importance|

  1. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. 
  2. लाल रंग कृती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो.
  3. निळा रंग सुख, समृद्धी आणि शांततेचा प्रतीक आहे.
  4. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
  5. हिरवा रंग विकास आणि सुपीकतेचे प्रतीक आहे. 
  6. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे. 
  7. केशरी रंग तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे.  
  8. मोरपंखी रंग अद्वितीयतेचे प्रतीक आहे. 
  9. गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि ऐक्याचे प्रतीक आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)