Shardiya Navratri 2025: नवरात्रीत घटस्थापना कशी करावी? मुहूर्त, पूजा विधी, पूजा सामग्री, 9 रंग जाणून घ्या

Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रौत्सवामध्ये घटस्थापना कशी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी? यासह उत्सावाची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 4 mins
"Shardiya Navratri 2025: नवरात्रीतील घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे?"

Navratri 2025 Date And Time: हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवास विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यामध्ये दुर्गामातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. नऊ दिवस देवीची पूजा, उपवास, जप, ध्यान, आरती, गरबा यासह अन्य धार्मिक गोष्टी भक्तिभावाने करण्याची परंपरा जपली जाते. यंदा 25 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रौत्सवाची तिथी, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, घटस्थापना कशी करावी, पूजा विधी यासह सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

नवरात्रौत्सवाची तिथी |Navratri 2025 Tithi | Shardiya Navratri 2025 | Kalash Sthapana

आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथी ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिर तसेच काही लोक घरामध्येही घटस्थापना करतात. 

घटस्थापना शुभ मुहूर्त | Navratri 2025 Ghatasthapana Puja Shubh Muhurat 

22 सप्टेंबर 2025 सोमवार

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत आहे.
अभिजित मुहूर्त : सकाळी 11:49 वाजेपासून ते दुपारी दुपारी 12:38 वाजेपर्यंत आहे. 

घटस्थापनेचे पूजा सामग्री | Navratri 2025 Ghatasthapana Puja Samagri 

मातीचे लहान मडके किंवा पितळेच्या धातूचा कलश, विविध प्रकरची धान्ये, गंगाजल, शुद्ध पाणी, सुपारी, लहान टोपली, विड्याची पाने, लवंग, अक्षता, सुटी नाणी, हळद-कुंकू, रांगोळी, आंब्याच्या डहाळ्या, श्रीफळ, फुले, लाल रंगाचे वस्त्र, दुर्वा, दीप-वाती, ताम्हन, पळी इत्यादी.

Advertisement

घटस्थापना करण्याची पद्धत | Navratri 2025 Ghatasthapana Puja Vidhi

  • चौरंगावर नवीन आणि लाल रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. 
  • चौरंगावर विड्याची पाने ठेवून आपले देवांची मूर्ती स्थापित करावी.  
  • बाजूला परातीमध्ये तांदळावर कलश ठेवावा. कलशाला लाल रंगाचा धागाही बांधावा. 
  • कलशामध्ये पाणी, नाणी, तांदूळ टाकून त्यावर विड्याच्या पानांवर श्रीफळ ठेवावे. 
  • कलशाला हळदकुंकू अर्पण करावे. त्यावर स्वस्तिक काढावे. यानंतर घटस्थापनेसाठी परडीमध्ये माती घ्यावी. 
  • मातीमध्ये सात प्रकारची धान्य पेरावीत, त्यावर कलश ठेवावा. 
  • लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी आणि ही माळ घटाला पहिल्या दिवशी बांधावी. 
  • देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर घट मांडावा. 
  • देवीच्या मूर्तीला हार-फुले अर्पण करुन अगरबत्ती, धूपदीप प्रज्वलित करुन पूजा करावी. 
  • देवीची आरती करावी, नैवेद्य अर्पण करावा. 

नऊ दिवस देवीसह घटाची पूजा करावी. रोज सकाळी षोडशोपचार पूजा आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी. घटस्थापनेनंतर अंगपूजा न केल्यास चालेल. 

नवरात्रीमध्ये कुमारी पूजनाचे महत्त्वाचे | Navratri 2025 Kanya Pujan | Navratri 2025 Kumari Pujan 

- नवरात्रौत्सवामध्ये कुमारी पूजन करण्याचीही परंपरा आहे, कारण त्या गौरी स्वरूप असतात; असे म्हणतात.
- नवरात्रौत्सवामध्ये कुमारींचे पूजन करतात, त्यांना हळद-कुंकू, मिष्ठान्न वाढून, त्यांची ओटी भरण्याची परंपरा आहे. 
- दोन वर्षाची कुमारी, तीन वर्षाची मुलगी त्रिमूती, चार वर्षाची कल्याणी, पाच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची कालिका, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा तर दहा वर्षाची सुभद्रा अशा कन्या देवीच्या रुपाचे प्रतीक मानल्या जातात. 

देवीची पूजा कशी करावी | How To Worship Goddess 

देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करताना मूर्ती किंवा प्रतीमेस अनामिकेने म्हणजे करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वाहाताना आधी हळद त्यानंतर कुंकू वाहावे. तेही उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वाहावे.  

Advertisement

(नक्की वाचा: Navratri 2025 Fasting Rules: नवरात्रीचे व्रत कसे करावे? 9 दिवस काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम)

देवीमातेची ओटी कशी भरावी  |Devimatechi Oti Kashi Bharavi?

देवीची ओटी भरताना ताटामध्ये साडी ठेवून त्यावर खण ठेवावा. खणावर नारळ ठेवावा. यानंतर ओटी दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्यावी. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. देवीला प्रार्थना करून खण, साडी आणि नारळ देवीच्या चरणी अर्पण करावे.  

Advertisement

(नक्की वाचा: Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर)

नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या कोणत्या रुपांची पूजा केली जाते? | Navratri 2025 Durga Mata Puja 
तारीख आणि वार नवरात्रौत्सवाचे दिवस दुर्गामातेचे स्वरुप
22 सप्टेंबर 2025, सोमवार पहिला दिवस शैलपुत्री माता
23 सप्टेंबर 2025, मंगळवार दुसरा दिवस ब्रह्मचारिणी माता
24 सप्टेंबर 2025, बुधवार तिसरा दिवस चंद्रघंटा माता
25 सप्टेंबर 2025, गुरुवार चौथा दिवस  कुष्मांडा माता
26 सप्टेंबर 2025, शुक्रवार पाचवा दिवस स्कंदमाता माता
27 सप्टेंबर 2025, शनिवार सहावा दिवस कात्यायनी माता
28 सप्टेंबर 2025, रविवार सातवा दिवस  कालरात्री माता
29 सप्टेंबर 2025, सोमवार आठवा दिवस  महागौरी माता
30 सप्टेंबर 2025, मंगळवार नववा दिवस सिद्धिदात्री माता

नवरात्री 2025 नऊ रंग | Navratri 2025 Colours

तारीख आणि वार नवरात्रौत्सवाचे दिवस नवरात्रौत्सवाचे रंग
22 सप्टेंबर 2025 पहिला दिवस पांढरा रंग
23 सप्टेंबर 2025 दुसरा दिवस लाल रंग
24 सप्टेंबर 2025 तिसरा दिवस निळा रंग
25 सप्टेंबर 2025 चौथा दिवस पिवळा रंग
26 सप्टेंबर 2025 पाचवा दिवस हिरवा रंग
27 सप्टेंबर 2025 सहावा दिवस राखाडी रंग
28 सप्टेंबर 2025 सातवा दिवस केशरी रंग
29 सप्टेंबर 2025 आठवा दिवस मोरपंखी रंग
30 सप्टेंबर 2025 नववा दिवस गुलाबी रंग

शेवटच्या दिवशी विधीवत देवीची मूर्ती आणि घटाचे विसर्जन करावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)