जाहिरात

Falguni Pathak: बाबो! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते इतके पैसे! नवरात्रीच्या 9 दिवसांची कमाई माहितेय का?

Garaba Queen Falguni Pathak Fees And Earning News: कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देश-विदेशातूनही लोक येतात. वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे.

Falguni Pathak: बाबो! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते इतके पैसे! नवरात्रीच्या 9 दिवसांची कमाई माहितेय का?

Garaba Queen Falguni Pathak Fees And Earning News: आपल्या गाण्यांनी लोकांची मनं जिंकणाऱ्या आणि 'गरबा क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवरात्रीच्या गरबा कॉन्सर्टसाठी त्यांची प्रचंड मागणी असते. मात्र, यंदा त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत ऐकून अनेक नेटकरी आणि चाहते थक्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फाल्गुनी पाठक यांच्या एका गरबा कॉन्सर्टचे तिकीट तब्बल ९,९९९ रुपयांपासून सुरू होऊन १,५०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

नवरात्रीत फाल्गुनी पाठकची चर्चा

फाल्गुनी पाठक यांनी १९८७ मध्ये आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण त्यांना खरी ओळख १९९८ मध्ये 'याद पिया की आने लगी' या गाण्याने मिळाली. आज ५६ वर्षांच्या असलेल्या फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देश-विदेशातूनही लोक येतात. वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे.

Navratri 2025, Top 10 Garba: मुंबईतील टॉप 10 ठिकाणी गरबा आणि दांडिया नाईट्स; तिकीट किती?

एका शोसाठी किती पैसे घेते?| Falguni Pathak Fees

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार, त्यांच्या गरबा कॉन्सर्टची तिकिटे दीड लाख रुपयांपर्यंत आहेत. या वर्षी फाल्गुनीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत १७९९ रुपयांपासून ते तब्बल दीड लाखांपर्यंत आहे. या शोमध्ये सिंगल डे पास, सिझन पास आणि ग्रुप तिकीट असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या महागड्या तिकीटांच्या जोरावरच फाल्गुनी पाठक अवघ्या ९ दिवसात १. ४ कोटींची कमाई करते. 

यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने 'एवढे पैसे कोण देईल?' असा प्रश्न विचारला असून, 'एका मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी इतके पैसे देणे शक्य नाही' अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे. तर, दुसऱ्या एका वापरकर्त्याने फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने ते कितीही महागडे तिकीट खरेदी करू शकतात, असे म्हटले आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com