Navratri 2025: पीरियड्समध्ये नवरात्रीची पूजा करणे योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराज जे म्हणाले ते ऐकून...

Navratri 2025: नवरात्रौत्सव आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवसांत दुर्गामातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Navratri 2025: मासिक पाळीदरम्यान महिलांनी पूजा करावी का?"

Navratri 2025 Period Rules: नवरात्री हा आपल्या देशातील अतिशय महत्त्वपूर्ण सण आहे. नवरात्रौत्सवामध्ये घराघरांत आणि मंदिरामध्येही दुर्गामातेची पूजा-अर्चना केली जाते. पण नेमके उत्सवादरम्यान मासिक पाळी आल्यास कित्येक महिलांच्या उत्साहावर विरजण पडते. अशातच मासिक पाळीदरम्यान पूजा करणे योग्य की अयोग्य? या मुद्यावर कित्येक चर्चा देखील रंगतात. प्रेमानंद महाराज यांनीही या मुद्यावर त्यांचे विचार मांडले आहेत.  पीरियड्समध्ये देवीची पूजा करावी की करू नये, याबाबत आपण माहिती जाणून घेऊया...

पीरियड्समध्ये नवरात्रीची पूजा करावी का, प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले?

मासिक पाळीदरम्यान पूजा करावी की करू नये, याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते. मासिक पाळीदरम्यान देवाची पूजा करावी की करू नये, या मुद्यावर प्रेमानंद महाराज यांनीही त्यांचे मत मांडलंय. प्रेमानंद महाराज म्हणाले की, "मासिक पाळीदरम्यान महिलांनी पूजापाठ किंवा कोणत्याही धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होऊ नये, असे शास्त्रांमध्ये लिहिलंय. या काळात महिलांसाठी पूजा करणं निषिद्ध मानले जाते. मासिक पाळीमध्ये ग्रंथ वाचन, स्वयंपाक आणि ईश्वराची सेवा करणे या सर्व गोष्टी टाळाव्या. या शास्त्रांद्वारे घालण्यात आलेल्या मर्यादा आहेत".

मासिक पाळीमध्ये महिला पूजा करू शकतात का?

काही लोकांच्या मते मासिक पाळीमध्ये पूजा करू नये. पण प्रेमानंद महाराजांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, "पीरियड्समध्ये असताना पूजा करणे काहीही गैर नाही. दुर्गामाता प्रत्येकाची प्रार्थना ऐकते. जर तुम्ही मनापासून पूजा केली तर देवी माता तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकारेल. त्यामुळे मासिक पाळी असल्यासही मनोभावे पूजा करावी, दुर्गामाता तुमच्यासोबत कायम आहे."

डॉक्टरांचे काय म्हणणंय?

पीरियड्समध्ये पूजा करू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणंय. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही  प्रक्रिया अशुद्ध नसते. म्हणूनच मासिक पाळीमध्येही देवीची मनापासून पूजा करू शकता, असे डॉक्टरांचे म्हणणंय. 

Advertisement

डॉ. निधी झा यांनी सांगितले की, बहुतांश लोक विचारतात की पीरियड्समध्ये होणाऱ्या स्त्रावातील रक्त अशुद्ध असते का? त्यामुळे पूजा-प्रार्थना करू शकतो का? की नाही? डॉ. निधी झा यांच्या माहितीनुसार, पीरियड्समधील रक्त अशुद्ध नसते, तर हे शरीराचे एक नैसर्गिक काम आहे. त्यामुळे पूजा-प्रार्थना केली जाऊ शकते. मनापासून देवाची पूजा करावी. 

(नक्की वाचा: Menstruation Cyle: मासिक पाळी सुरू झाली की केळीच्या झाडाशी लग्न! देशात 'इथं' आजही पाळली जाते अजब परंपरा)

Advertisement

(नक्की वाचा: Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)