Navratri 2025: नवरात्रीच्या 9 दिवसात कोणता नैवेद्य अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतील? जाणून घ्या एका क्लिकवर

Navratri 2025: हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवामध्ये दुर्गामातेची पूजा, व्रत करण्यास विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Navratri 2025 Devi Puja Bhog: नवरात्रीमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा?"

Navratri 2025: हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रौत्सवातील पूजा-व्रत करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यंदा 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रौत्सवास शुभारंभ होतोय. शक्तीभक्तीशी संबंधित असलेल्या या उत्सवामध्ये विधीवत पद्धतीने दुर्गामातेची पूजाअर्चना केल्यास देवी प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करते, असे म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. देवीला कोणकोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करणे लाभदायक ठरू शकते, जाणून घेऊया माहिती..

नवरात्रौत्सवामध्ये देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा? 

नवरात्रीचा पहिला दिवस | Navratri 2025 First Day Bhog

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, नवरात्रीचा पहिला दिवस शैलीपुत्रीमातेला समर्पित आहे, शैलीपुत्री मातेच्या कृपेने भाविकांना सर्व प्रकारेच सुख आणि सौभाग्य प्राप्त होतात. तुम्हालाही वरदान मिळवायचे असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नैवेद्यामध्ये विशेष स्वरुपात तूप अर्पण करावे. 

नवरात्रीचा दुसरा दिवस | Navratri 2025 Second Day Bhog

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरुपाची पूजा केली जाते. या मातेच्या आशीर्वादाने भाविकाला दीर्घायुष्य मिळते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजेदरम्यान साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.

नवरात्रीचा तिसरा दिवस | Navratri 2025 Third Day Bhog

हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेला प्रसन्न करण्यासाठी दूधयुक्त पदार्थ उदाहरणार्थ खीर इत्यादी गोष्टी अर्पण करू शकता. दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघंटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते, असे मानले जाते.  

Advertisement

नवरात्रीचा चौथा दिवस | Navratri 2025 Fourth Day Bhog

चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, या दिवशी देवीला प्रिय असणारा मालपुआचा नैवेद्य अर्पण केल्यास देवीची लवकरच कृपादृष्टी होते. देवी कुष्मांडा तिच्या भाविकांना विवेक आणि बुद्धीचा आशीर्वाद देते, असे म्हणतात. 

नवरात्रीचा पाचवा दिवस | Navratri 2025 Fifth Day Bhog

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी केळ्यांचा नैवेद्य अर्पण करावा. 

नवरात्रीचा सहावा दिवस | Navratri 2025 Sixth Day Bhog

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्यास भाविकांच्या वैभव आणि मानसन्मानामध्ये वाढ होते, असे म्हणतात. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा. 

Advertisement

(नक्की वाचा: Navratri 2025 Date: नवरात्रौत्सव कधी आहे? तिथी, घटस्थापना, शुभ मुहूर्त, 9 रंग आणि त्यांचे महत्त्व जाणून घ्या)

नवरात्रीचा सातवा दिवस | Navratri 2025 Seventh Day Bhog

सातव्या दिवशी कालरात्री देवीची विधीवत पूजा करावी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी गुळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हा उपाय केल्यास माता कालरात्री भाविकांना सर्व संकटांपासून मुक्त करते आणि संरक्षण प्रदान करते, असे म्हणतात. 

Advertisement

नवरात्रीचा आठवा दिवस | Navratri 2025 Eight Day Bhog

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवीला पूजेमध्ये नारळ किंवा नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हा उपाय केल्यास देवी भक्तांना सुख-सौभाग्याचे वरदान देते, असे म्हणतात.
 
नवरात्रीचा नववा दिवस | Navratri 2025 Ninth Day Bhog

नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धिदात्री देवीची पूजा केल्यास भाविकांची सर्व कामं पूर्ण होतात,असे म्हणतात. नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीला शिरापुरी आणि चण्यांचा नैवेद्य अर्पण केल्यास कामांमध्ये यश मिळते, अशी श्रद्धा आहे.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)