New GST Rates: बाहेर जेवायला जाताय? आता तुमचा खिसा जास्त रिकामा होणार नाही! वाचा कसा होणार तुमचा फायदा

New GST Rates for Restaurants in India : तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि तुम्हाला नेहमी बाहेर जेवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे!

जाहिरात
Read Time: 2 mins
New GST Rates for Restaurants : नव्या जीएसटी रेटमुळे बाहेरचे खाणे स्वस्त होणार आहे.
मुंबई:

New GST Rates for Restaurants in India : तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि तुम्हाला नेहमी बाहेर जेवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! आता रेस्टॉरंटमध्ये जेवण खूप स्वस्त होणार आहे. सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेस्टॉरंटमधील जेवणावरील GST दर खूप कमी झाला आहे.

 हे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे रेस्टॉरंटमधील जेवण तसेच अनेक दैनंदिन वापरातील वस्तू लक्षणीयरीत्या स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

या बदलांचा थेट परिणाम रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. आता सर्व प्रकारच्या रेस्टॉरंटसाठी जीएसटी दर 12% आणि 18% वरून एकसमान 5% करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक जेवण, मित्रमंडळींसोबतची पार्टी आणि बाहेर खाणे आता अधिक परवडणारे होईल. हा निर्णय रेस्टॉरंट उद्योगाला पुन्हा उभारी देण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.

( नक्की वाचा : MHADA News : सर्वात मोठी पुनर्विकास योजना; गोरेगावच्या रहिवाशांना ‘जॅकपॉट' लागला; 1600 चौरस फूट घर मिळणार )
 

या खाद्यपदार्थांवर शून्य जीएसटी

काही अत्यावश्यक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. यामुळे खालील वस्तू आता पूर्णपणे जीएसटीमुक्त झाल्या आहेत

  • सर्व प्रकारचे चपाती आणि पराठे
  • अल्ट्रा-हाय टेंपरेचर (UHT) दूध
  • पनीर
  • पिझ्झा ब्रेड
  • खाकरा

दैनंदिन वस्तूंचे नवीन जीएसटी दर

ज्या वस्तूंवर पूर्वी 12% किंवा 18% जीएसटी लागत होता, त्यावर आता 5% जीएसटी लागेल. या वस्तूंमध्ये खालील बाबींचा समावेश आहेब

  • टर आणि तूप
  • सुका मेवा
  • कंडेंस्ड मिल्क
  • सॉसेजेस आणि मांस
  • साखरेपासून बनवलेली मिठाई, जॅम आणि फ्रूट जेली
  • शहाळ्याचे पाणी
  • नमकीन
  • 20-लीटरच्या कंटेनरमधील पिण्याचे पाणी
  • आईस्क्रीम, पेस्ट्री, बिस्किटे, तृणधान्ये आणि साखरेची मिठाई
  • इतर फॅट्स आणि चीज

( नक्की वाचा : Navi Mumbai Airport : लंडनच्या ‘हीथ्रो' प्रमाणे भव्य... नवी मुंबई विमानतळाचे 'या' तारखेला उद्‌घाटन )
 

आरोग्यदायी पर्यायांवरही कमी कर

या निर्णयामुळे आरोग्यदायी खाद्यपदार्थांनाही चालना मिळेल. प्लांट-बेस्ड आणि सोया मिल्कवरचा जीएसटी दर अनुक्रमे 18% आणि 12% वरून एकसमान 5% करण्यात आला आहे.

थोडक्यात काय, या मोठ्या बदलामुळे आता बाहेर जेवण करताना किंवा रोजच्या वस्तू विकत घेताना तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे आगामी काळात तुम्हाला सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह अधिक मनमुराद हॉटेलिंग करता येणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article