सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन पर्सनॅलिटी टेस्ट्स (Optical Illusion Personality Tests) अत्यंत लोकप्रिय होत आहेत. असं म्हणतात की या ऑप्टीकल इल्युजन टेस्ट या मानसशास्त्रावर आधारित असतात, ज्यातून एखाद्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घेण्यास मदत होते. मरिना न्यूरेलीन ( Marina Neuralean) या मानसशास्त्रज्ञ असून त्या सोशल मीडियावर सगळ्यांसाठी काही टीप्स शेअर करत असताता. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय असा प्रश्न त्यांनी विचारला असून त्यांनी प्रत्येक प्राण्यानुसार व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्येही सांगितले आहे.
BIRD (पक्षी)
तुमचा स्वभाव मोकळा ढाकळा आहे. तुम्ही खूप कल्पक (Creative) आहात, बदल आत्मसात करण्यास घाबरत नाही आणि सतत नावीन्यतेच्या अथवा स्वातंत्र्याच्या शोधात असता. तुम्ही नेहमी स्वतःच्या प्रगतीची संधी शोधत राहता आणि याचमुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरता.
DEER (हरिण)
तुम्ही खूप संवेदनशील आणि हळवी (Empathetic) व्यक्ती आहात. तुम्हाला इतरांची काळजी असते, त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये तुम्ही लगेच सहभागी होता आणि त्यांच्याशी सहज जोडले जाता. तुम्हाला पुढे होणाऱ्या गोष्टींचे आकलन (Intuition) पटकन होते. तुमच्या अंगी असलेला शांतपणा (Calm Elegance) तुम्हाला कठीण परिस्थितीतही नम्र ठेवतो आणि प्रगतीसाठी सहाय्यक ठरतो.
GIRAFFE (जिराफ)
तुम्ही हुशार आहे हजरजबाबी (Witty) आहात, सद्यस्थिती पलिकडील (Above the situation) गोष्टी पाहण्याची तुमच्यात नैसर्गिक क्षमता आहे. तुमची शांत वृत्ती (Grace), आत्मविश्वास आणि दूरदृष्टी जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरते. तुम्हाला उत्सुक (Curious) आणि बुद्धिमान लोक आवडतात आणि अर्थपूर्ण नात्यांमध्ये (Meaningful Connections) तुम्हाला आनंद मिळतो.
RHINO (गेंडा)
तुमचे व्यक्तिमत्त्व मजबूत आणि कणखर (Unshakable) आहे. तुम्ही लवकर हार मानत नाही (Resilient), तुमच्या अंगी निर्णय (Decisive) घेण्याची क्षमता आहे आणि अडचणींना तुम्ही घाबरत नाही. तुम्ही समस्यांना तोंड देता आणि न अडखळता योग्य त्या गोष्टींसाठी झटता
FOX (कोल्हा)
तुम्ही चतुर आणि कल्पक (Resourceful) आहात. हुशारी (Wit) आणि चपळाईचा वापर करून तुम्ही तुमचे ध्येय साधता आणि नेहमी उत्तम पर्याय शोधता. तुमच्यातील जुळवून घेण्याची क्षमता (Adaptability) तुम्हाला कोणतीही परिस्थिती सहज हाताळण्यास मदत करते.
ELEPHANT (हत्ती)
तुम्ही चंचल नाहीत आणि तुमच्या अंगी शहाणपणा आहे. कठीण परिस्थितीतही शांत राहत आणि स्वतःच्या विकासासाठी (Personal Growth) नेहमी प्रयत्नशील असता. तुमचा संयम (Patience), सहानुभूती आणि मिळून मिसळून काम करण्याची क्षमता हीच तुमची खरी ताकद आहे.
WOLF (लांडगा)
तुम्ही अत्यंत उत्साही (Driven) आहे. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केलेले असते आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करत असता. ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना तुम्ही अजिबात जगमगत नाही. तुमच्या अंगी नेतृत्वगुण असतात आणि त्यामुळे तुम्ही इतरांना आकर्षित (Charisma) करता.
MOUNTAIN GOAT (डोंगरावरील बकरी)
तुम्ही कणखर, ध्येयनिष्ठ (Goal-oriented) आणि अतिशय चिकाटी (Persistent) असलेले आहात. यशाच्या मार्गातील कठीण अडथळ्यांवरही तुम्ही सहज मात करता. तुमचा प्रामाणिकपणा, विश्वासार्हता (Reliability) आणि निष्ठा (Loyalty) यामुळे तुम्ही सगळ्यांचे लाडके असता.
LEOPARD (चित्ता)
तुमचे व्यक्तिमत्त्व धाडसी, उत्साही आणि साहसी (Adventurous) आहे. नव्या गोष्टी जाणून घेण्याची, आत्मसात करण्याची तुम्हाला उर्मी असते. त्यासाठी नव्या आव्हानांना तोंड देण्याचीही तुमची तयारी असते. तुम्ही निर्भय (Fearlessness) असता ज्यामुळे मोठं उद्दिष्ट्य गाठणे हे तुमचे ध्येय असते. तुम्ही परिस्थितीचे झटकन आकलन करता आणि त्यानुसार कामही करता. एकाद्या गोष्टीचे अचूक विश्लेषण करणे ही देखील तुमची जमेची बाजू आहे.
या चाचण्या मानसशास्त्रीय सिद्धांतांवर (Psychological theories) आधारित असल्याचा दावा केला जातो. परंतु त्यांचे निष्कर्ष केवळ मनोरंजनासाठी आणि आत्म-जागरूकतेसाठी वापरले जातात. अनेक लोकांना या चाचण्यांमध्ये त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब दिसले असल्याने या ऑप्टीकल इल्युजनची लोकप्रियता वाढते आहे.