Ambulance Rules: केंद्र सरकारने रस्त्यावर चालणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.या नियमांच्या माध्यमातून काही खास कॅटेगरीच्या रुग्णावाहिकेत आता नवी सुरक्षा आणि एमरजन्सीला जोडलेल्या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे.तसच इलेक्ट्रिक रुग्णवाहिकेसाठीही वेगळे निमय निश्चित करण्यात आले आहेत.हे ड्राफ्ट नियम रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (MoRTH) ने जारी केलं आहे. या नव्या नियमांच्या माध्यमातून रुग्णावाहिकेच्या सुरक्षेला उत्तम बनवणं आणि रुग्णांना नेणाऱ्या वाहनांमध्ये चांगल्या प्रकारच्या मेडिकल सुविधा निश्चित करायच्या आहेत.
रुग्णवाहिकेसाठी AIS-125 नियम अनिवार्य
ड्राफ्ट नियमांनुसार,1 एप्रिल 2018 नंतर बनवण्यात आलेल्या सर्व रोड एम्बुलन्स म्हणजे L आणि M कॅटेगरीच्या गाड्यांना AIS-125 (Part-1) 2014 च्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. पुढे जर या नियमांमध्ये काही बदल झाला,तर त्या नियमांचंही पालन करावं लागेल.
नक्की वाचा >> Pahalgam Attack: दहशतवादी कोणत्या रस्त्याने आले? कुठे थांबले? कोणी केली मदत? NIA चार्जशीटमध्ये मोठा खुलासा
काही रुग्णावाहिकेत असतील सेफ्टी आणि रेस्क्यू उपकरण
सरकारने हा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे की,काही खास प्रकारच्या रुग्णवाहिकेत एमरजन्सी आणि रेस्क्यू उपकरण लावणं अनिवार्य होईल.एम कॅटेगरीच्या Type B, Type C आणि Type D एम्बुलन्स सर्वांमध्ये फायनल नियम लागू होण्याच्या 3 महिन्यानंतर बनवण्यात येणाऱ्या एम्बुलन्समध्ये हे नियम लागू होणार. याचसोबत या सर्वांमध्ये AIS-125 नुसार निश्चित सुरक्षा आणि एमरजन्सी उपकरण लावणं आवश्यक असेल.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 34 कोटींची ब्राऊन शुगर जप्त, पठाण गँगच्या म्होरक्याला अटक
इलेक्ट्रिक एम्बुलन्ससाठी नवे नियम
सरकारने इलेक्ट्रिक अॅम्बुलन्ससाठीही नवीन नियम निश्चित केले आहेत. 1 ऑक्टोबर 2026 नंतर बनवण्यात येणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक एम्बुलन्समध्ये एक्स्ट्रा बॅटरी लावणं आवश्यक असेल. या बॅटऱ्या एम्बुलन्समध्ये लावण्यात आलेले मेडिकल उपकरण ऑक्सिजन,मॉनिटर इ.चालवण्यासाठी असतील. या अतिरिक्त बॅटरीचे नियम आणि स्पेसिफिकेशन AIS-125 नियमांनुसार निश्चित केले जातील आणि वेळोवेळी बदलण्याची शक्यता आहे.