Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशी तिथी, मुहूर्त, व्रत कसे करावे? वाचा ज्योतिषी दीक्षितांनी दिलेली माहिती

Nirjala Ekadashi 2026 Rules: निर्जला एकादशी व्रत कसे करावे? ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांनी सांगितलेले नियम, पूजेची पद्धत आणि व्रताचे महत्त्व नक्की जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nirjala Ekadashi 2026 Rules: निर्जला एकादशी व्रताचे नियम"
Canva

Nirjala Ekadashi 2026: ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी 'निर्जला एकादशी' म्हणून ओळखली जाते. वर्षातील 24 एकादशी तिथींमध्ये निर्जला एकादशीला सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. या एकादशीला 'भीमसेनी एकादशी'असेही म्हणतात. ज्योतिष पंचांगानुसार, ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीची सुरुवात 24 जून रोजी संध्याकाळी 6.13 वाजता झाली असून आज संध्याकाळी 8.10 वाजता तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचे व्रत 25 जून रोजी पाळले जात आहे. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून निर्जला एकादशी व्रताचे नियम जाणून घेऊया...

निर्जला एकादशीच्या व्रताची सुरुवात कशी करावी?

  • ज्योतिषाचार्य दीक्षित यांनी सांगितले की, निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंचे स्मरण करावे. 
  • यानंतर भक्तिभावाने व्रताचा संकल्प करावा. 
  • व्रताचा संकल्प केल्यानंतर एकादशी तिथीपासून ते द्वादशी तिथीपर्यंत अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. 
  • व्रतादरम्यान भगवान विष्णूंची पूजा करणे आणि त्यांचे ध्यान करणे शुभ मानले जाते.

पूजेमध्ये कथा नक्की वाचावी, कारण...

ज्योतिषाचार्य डॉक्टर गौरव कुमार दीक्षित यांच्या मते, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. पूजेमध्ये एकादशी व्रत कथेचे पठण नक्की करावे. जर निर्जला एकादशीची कथा ऐकली नाही, तर व्रत अपूर्ण मानले जाते.

Advertisement

(नक्की वाचा : Travel Story: 12 ज्योतिर्लिंग यात्रेला कुठून सुरुवात करावी? तुमच्या लोकेशननुसार 'असा' ठरवा मार्ग)

हे नियम ठेवा लक्षात 
  • निर्जला एकादशीच्या दिवशी मन आणि वर्तन दोन्ही शुद्ध ठेवणे गरजेचे मानले जाते. 
  • खोटे बोलणे, कोणाचे वाईट चिंतणे किंवा कपटी भावना ठेवणे या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.
  • सात्विक विचार आत्मसात करावे आणि गरजू लोकांना मदत करावी.
  • व्रतादरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करणे देखील आवश्यक मानले गेले आहे.
  • या दिवशी पलंगाचा त्याग करून जमिनीवर विश्राम केला जातो.
  • व्रताची समाप्ती द्वादशी तिथीला केली जाते. 
  • सकाळी शुभ वेळेत फलाहार करून व्रताचे पारण करावे.

ज्योतिषाचार्य दीक्षित यांनी पुढे असेही सांगितले की, निर्जला एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि व्रताचे फळ अनेक पटींनी वाढून मिळते. यासोबतच या दिवशी अन्न, धन किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. यामुळे व्रताचे पुण्य अनेक पटींनी वाढते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)