No Sugar for 2 Weeks : 2 आठवडे साखर बंद केली तर...? तुमचं व्यक्तिमत्त्वचं बदलून जाईल, ट्राय करून पाहा!

एक चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मेंदू पुढील दोन तासांसाठी स्लो होतो. साखर एक सायको अॅक्टिव पदार्थ आहे.  ज्याचा एखाद्या ड्रग्ज प्रमाणे आपल्या शरीरावर परिणाम होतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

No sugar for 2 weeks : शारीरिक आरोग्याबरोबर मेंदू परिणाम मेमरी चांगली राहावी याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र सध्या आपण बाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष देतो आणि मेंदू दुर्लक्षित राहतो. फिटनेससाठी साखर, तेल, मीठ याचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र प्रत्यक्षात आहारातून साखर कमी केली तर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. न्यूरोसर्जन डॉ. संदीप मवानी (Dr Sandip Mavani (Neurosurgeon)) यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

आहारातून दोन आठवडे साखर बंद केल्याने आरोग्यासाठी सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. एक चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मेंदू पुढील दोन तासांसाठी स्लो होतो. साखर एक सायको अॅक्टिव पदार्थ आहे.  ज्याचा एखाद्या ड्रग्ज प्रमाणे आपल्या शरीरावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला साखरेचं व्यसन लागतं. मात्र जर तुम्ही दोन आठवड्यांसाठी साखर बंद केली तर तुमचा मेंदू सुपर कम्प्युटरप्रमाणे अॅक्टिव्ह होईल. 

दोन आठवडे साखर बंद केली तर तुमच्या मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो?

साखर बंद केल्यानंतर पहिले तीन दिवस तुमच्यासाठी खूप कठीण असेल. कारण त्या काळात तुमच्या मेंदूला डोपामिन मिळणार नाही. याचा परिणाम डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा जाणवेल.  मात्र हे नॉर्मल आहे. कारण या काळात तुमचा मेंदू रिसेट होत असतो. चार दिवसांनंतर मेंदूत इन्फ्लामेशन कमी होऊ लागेल आणि तुमची मेमरी १२ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.

मूड स्विंग्स कमी होतील आणि भूकही नियंत्रणात राहील. मात्र खरी जादू दोन आठवड्यांनंतर दिसून येईल. यानंतर तुमचा फोकस साधारण ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. टेन्शन ४० टक्क्यांपर्यंत कमी जाणवू लागेल. आणि झोपही चांगली लागेल. साखर कमी केल्याने न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. म्हणजेच तुम्ही तुमचा मेंदू रिवायर करू शकता. जे लोक साखर घेत नाहीत अशा व्यक्ती नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात किंवा लवकर शिकतात. 

Advertisement