जगात एकमेव : देशातील 'या' शहरात कुणीही खात नाही नॉन व्हेज! सरकारनंच घातली बंदी

City of vegetarian : या शहरात मांसाहार करण्यास बंदी आहे. मांसाहारास बंदी घालणारं हे जगातील पहिलं शहर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Non-Veg Food : मांसाहारास बंदी घालणारं हे जगातील पहिलं शहर आहे.
मुंबई:

City of vegetarian :  शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार? हा वाद दोन्ही गटातील खवय्यांमध्ये नेहमी रंगतो. पण, या शहरातील मंडळींनी या वादावर स्वत:पुरतं उत्तर दिलंय. या शहरात मांसाहार करण्यास बंदी आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार मांस खाण्यासाठी जनावरांची हत्या, मांस विक्री यावर बंदी घालण्यात आलीय. फक्त मांसच नाही तर अंडी विक्री करण्यातही बंदी घातली आहे. कोणत्याही व्यक्तीनं हा नियम तोडला तर त्याला दंड आकरण्याची तरतूद आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठे आहे हे शहर?

गुजरातमधील (Gujrat) भावनगर (Bhavnagar) जिल्ह्यातल्या पालिताना  (Palitana non veg illegal) या शहरात मांसाहार खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांसाहारास बंदी घालणारं हे जगातील पहिलं शहर आहे.

का घेतला निर्णय?

पालिताना शहरात हा निर्णय जाहीर होण्याचं कारणही खास आहे. जवळपास 200 जैन साधूंनी सातत्यानं या विषयावर आवाज उठवल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. जैन समाजात अहिंसा हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. या समाजातील साधूंनी शहरातील 250 कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. या विषयावर त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं पालिताना हे शाकाहारी शहर घोषित केलं. 

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
 

काय आहे कारण? (  What was the reason for banning non-veg in Palitana)

गुजरातमधील पालिताना शहरात मांसाहारी खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मांस पाहणे हे त्रासदायक होते. त्याचा लोकांवर विशेषत: मुलांवर नकारात्मक परिणाम होतो, असा दावा या बंदीची मागणी करणाऱ्या व्यक्तींनी केला होता. 

Advertisement

पालितानाचं महत्त्व काय?

नॉन व्हेज खाण्यास बंदी असलेलं पालिताना हे जैन धर्मीयांच्या सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. या शहराला 'जैन मंदिर शहर' हे नाव देखील मिळालं आहे. शत्रूंजय पहाडाजवळ वसलेल्या या शहरात 800 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. त्यामध्ये आदिनाथ मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिराला दरवर्षी हजारो भक्त तसंच पर्यटक भेट देतात.  
 

Topics mentioned in this article