Oats Side Effect : नाश्त्यात ओट्स खाणं किती सुरक्षित; तुम्ही फॉलो करीत असलेला डाएट एकदा तपासून पाहा!

ओट्स खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का, जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins

Oats Side Effect : आजकाल लोक आपल्या आरोग्यानुसार डाएट निवडतात. सद्यस्थितीत मॉर्डन वर्ल्डमध्ये ओट्स लोकांचा आवडता नाश्ता झाला आहे. ओटमील म्हणजे ओट्सपासून तयार केलेला नाश्त्यात मुबलक प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोट भरलेलं राहतं. मात्र जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात ओट्स खात असाल तर तुम्हाला यामध्ये काही फेरफार करण्याची गरज आहे. 

ओट्स हेल्दी आणि टेस्टी असतं. यामध्ये दूध, फळं, विविध प्रकारच्या बिया आणि ड्रायफ्रूट्स टाकले तर ते अधिक चवदार लागतं. मात्र दररोज ओट्स खाल्ल्याने मोठं नुकसान होऊ शकतं. दररोज ओट्स खाल्ल्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि कोणी ओट्स दररोज खाणं टाळावं. 

ओट्स खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का, जाणून घेऊया...

ग्लुटेन सेन्सिव्हिटी

ओट्स ग्लुटेन फ्री असतं. मात्र अधिकांश कारखान्यांमध्ये ओट्स ग्लुटेन युक्त उदा. गहू, तांदूळ या धान्यासोबत   प्रोसेस केलं जातं. त्यामुळे ओट्समध्ये क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकतं. जर तुम्हाला सीलिएक डिजिज किंवा ग्लुटेनची एलर्जी आहे, तर सर्टिफाइड ग्लुटेन फ्री ओट्स निवडा. अन्यथा पोटदुखी, सूज किंवा पचनासंबंधित त्रास उद्भवू शकतात. 

गॅस आणि पचनाची समस्या...

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनासाठी चांगलं असतं. मात्र जर तुमच्या शरीराला फायबरची सवय नसेल तर अधिक प्रमाणात ओट्स खाल्ल्याने पोट फुगणे, जडपणा उद्भवू शकतो. फायबरचं प्रमाण हळूहळू वाढवावं. सुरुवात कमी प्रमाणातून करावी, यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल. 

Advertisement

नक्की वाचा - Vitamin D: व्हिटॅमिन डी म्हणजे काय? सूर्यस्नानासाठीची योग्य वेळ, व्हिटॅमिन डीयुक्त डाएटसह जाणून घ्या महत्त्वाची माहिती

खनिजांचे शोषण...

ओट्समध्ये फायटिक अॅसिड असतं. ज्यामुळे कॅल्शियम, आर्यन आणि झिंकसारख्या मिनरल्सचं शोषण कमी होतं. जर तुम्ही दररोज ओट्स खात असाल तर यामुळे तुम्हाला पुरेसं पोषण तत्व मिळणार नाही. त्यामुळे ओट्स शिजविण्यापूर्वी भिजवणे किंवा फर्मेंट करणं चांगलं असतं. ज्यामुळे फायटिक अॅसिडची पातळी कमी होते. ज्यामुळे शरीरात पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषित केले जाऊ शकतात. 

Advertisement

वजन वाढणं...

ओट्स वजन कमी करण्यास मदत करतं. मात्र गरजेपेक्षा जास्त ओट्स खाल्ल्याने वजन वाढू शकतं. १०० ग्रॅम ओट्समध्ये साधारण ३७९ कॅलरीज असतात. जर तुम्ही मोठ्या वाटीत ओट्स, फळं आणि ड्रायफ्रुट्स मोठ्या प्रमाणात घेऊन खात असाल तर तुमचं दिवसातील कॅलरीचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे पोर्शनवर लक्ष द्यायला गवं आणि काही दिवसात स्मूदी, योगर्ट किंवा व्हेजिटेबल ऑमटेलसारख्या पर्यायांचा अवलंब करू शकता. 

पोषण घटकांची कमतरता...

ओट्स पौष्टिक असतात. मात्र यामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळत नाहीत. जर तुम्ही दररोज सकाळी केवळ ओट्स खात असाल तर तुम्हाला प्रोटीन, विटॅमिन आणि काही मिनरल्सची कमतरता होऊ शकते. त्यामुळे संत

Advertisement

दररोज ओट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

- ओट्सचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात, मात्र हे संतुलित प्रमाणात घ्यावेत.
- आठवड्यात दोन ते तीन वेळा ओट्स खाणे उपयुक्त.
- यातून कोणत्याही दुष्परिणामाशिवाय ओट्सचे फायदे मिळवू शकता.