OpenAI ने आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचं अधिक वेगवान आणि स्वस्त व्हर्जन ChatGPT-4o लॉन्च केलं आहे. गेल्यावर्षी कंपनीने ChatGPT-4 मॉडेलमध्ये काही बदल केले होते. यामध्ये आता 'o' चा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ ओम्नी असा असून याचा यूजर इंटरफेस पूर्णपणे वेगळा असणार आहे.
नवीन मॉडेलमध्ये फोटो अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले जाणार आहे. म्हणजेच एखाद्या भाषेतील मेन्यू कार्डचा फोटो काढल्यास ChatGPT-4o त्याला पटकन भाषांतर करुन देईल. यासोबतच खाण्याचे पदार्थ आणि त्यासंबंधीची सर्व माहिती तुम्हाला लगेच मिळेल. यासोबत ChatGPT-4o तुम्हाला खाण्याच्या काही टिप्स देखील देईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
OpenAI च्या चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर मीरा मारुती (Mira Maruti) यांनी याबाबत सांगितलं की, हे नवीन मॉडेल फ्री असणार आहे. ChatGPT-4o च्या पेड मॉडेलमध्ये अधिकच्या फीचर्सचा समावेश असणार आहे. ChatGPT-4o मॉडेल लवकरच ChatGPT मध्येच उपलब्ध होणार आहे.
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या X अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं की, "आतापर्यंत ChatGPT-4 मॉडेल केवळ मासिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना वापरता येत होतं. मात्र AI सारखे टूल्स लोकांनी वापरणे गरजेचं आहे."
नक्की वाचा- AC Servicing At Home : तुम्ही घरातच करु शकता एसी सर्व्हिसिंग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो
फ्री यूजर्ससाठीचे फीचर्स
- ChatGPT-4 लेव्हल इंटेलिजेन्स.
- मॉडेल आणि वेब, दोन्हीकडून मिळणारे रिस्पॉन्स.
- डेटा अॅनालिसीस आणि चार्ट बनवण्याची सुविधा.
- फोटोसंबंधीची माहिती.
- फाईल अपलोड करण्याची सुविधा, त्यातील लिखाण आणि त्याचे विश्लेषण.
- GPTs आणि GPT स्टोअरचा वापर.
फ्री यूजर्ससाठी ChatGPT-4o च्या वापरासाठी ठराविक लिमिट असणार आहे. ही मर्यादा संपल्यानंतर ChatGPT-3.5 मध्ये रुपांतर होईल.
( नक्की वाचा : शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )
ChatGPT च्या पुढे काय?
ChatGPT ची आधुनिक आवृत्ती विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. ज्यामध्ये नॅचरल, रिअल टाईम संवाद साधता येणार आहे. ChatGPT च्या माध्यमातून रिअल टाईम व्हिडीओ देखील तयार करता येतील. उदाहणार्थ, यूजरने एखादा स्पोर्ट्ससंबंधित व्हिडीओ शेअर केला तर AI सॉफ्टवेअर त्या स्पोर्ट्ससंबंधित गाइडलाईन आणि नियमांची माहिती देईल.
नवीन AI सॉफ्टवेअर 50 हून अधिक भाषांमध्ये काम करु शकेल. OpneAI ने अॅपल यूजर्ससाठी ChatGPT चा डेस्कटॉप अॅप देखील लॉन्च केला आहे. यूजर्स 'ऑप्शन+स्पेस' कमांड देऊन ChatGPT ला प्रश्न विचारु शकतात.
ChatGPT-4o ने व्हिडीओ कपॅसिटीसोबत वॉईस मोड फीचर देखील डिझाईन केलं आहे. याद्वारे यूजर्स नवीन बिझनेस आयडिया तयार करु शकतील. यासोबत मुलाखतींची तयारी देखील करु शकतील. ChatGPT च्या नवीन व्हर्जनमध्ये नवीन मित्र तसेच त्यांच्यासोबत संवाद साधण्याची देखील सुविधा आहे.