PAN-Aadhaar Link: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही? घरबसल्या काही मिनिटांत करा लिंक आणि चेक करा स्टेटस

PAN Aadhaar Link Online: पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर तुम्ही आयकर रीटर्नची प्रक्रिया करू शकणार नाही आणि कर परतावा मिळण्यासही विलंब होईल. बँकिंग आणि आर्थिक व्यवहार करणंही कठीण होऊ शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins
"PAN Aadhaar link status: तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलंय का?"

PAN Aadhaar Link Online: आता छोट्या-मोठ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. बँक खात्यांपासून ते शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, कर परतावा आणि केवायसीपर्यंत प्रत्येक कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. दुसरीकडे आधार कार्ड सरकारी आणि वैयक्तिक व्यवहारांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. या कारणास्तव सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे (पॅन-आधार लिंक) अनिवार्य केलंय. 

...तर PAN कार्ड निष्क्रिय होईल, शेवटची तारीख 31 डिसेंबर 

तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेले नसेल तर तुमच्याकडे जास्त वेळ नाहीय. सरकाने स्पष्ट केलंय की, पॅन कार्ड आणि आधार कार्ड 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंक करणं आवश्यक आहे. अंतिम तारखेपर्यंत ही प्रक्रिया न केल्यास 1 जानेवारी 2026पासून तुमचे पॅन कार्ड काम करणार नाही आणि तुमची महत्त्वाची कामं अडकून राहतील. 

पॅन कार्ड कोणत्या लोकांनी लिंक करणं आवश्यक आहे?

इनकम टॅक्सच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ज्या लोकांना 1 जुलै 2017 किंवा त्यापूर्वी पॅन कार्ड मिळालेलं नाही, त्यांनी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे, मग ते ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असोत किंवा नसोत. नवीन पॅन कार्डसाठी आधार-आधारित पडताळणी आवश्यक आहे.

पॅन कार्ड - आधार कार्ड कसे लिंक करावे, जाणून घ्या सोपी पद्धत

  • PAN कार्ड आणि Aadhaar कार्ड लिंक करण्यासाठी इनकम टॅक्स ई फायलिंग पोर्टल लिंक ओपन करा.
  • लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल सेक्शनमध्ये Link Aadhaar चा पर्याय दिसेल. 
  • येथे पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील नंबर सबमिट करा आणि ई-पे टॅक्सच्या माध्यमातून निश्चित शुल्क भरावे लागेल.  
  • शुल्क भरल्यानंतर पोर्टलवर जाऊन आधार आणि PAN कार्ड लिंक करा. 

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर असं चेक करा स्टेटस

  • तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक आहे की नाही, हे तुम्हाला माहिती नसेल तर घाबरू नका.  

  • इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर Link Aadhaar Status पर्याय क्लिक करून पॅन आणि आधार कार्डवरील नंबर सबमिट करा. 
  • नंबर सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला स्टेटस दिसेल. 
  • आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक आहे, लिंक नाही आणि अजूनही प्रक्रियेत आहे, असे तीन मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. 
पॅन कार्ड आणि आधार कार्डवरील तपशील मॅच करत नसतील तर काय करावे?

नाव, जन्म तारीख किंवा लिंगशी संबंधित माहिती वेगवेगळी असल्या कारणामुळे आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत आधार कार्डवरील तपशील UIDAI वेबसाइटवर जाऊन दुरूस्त करू शकता. पॅन कार्डवरील माहिती सुधारण्यासाठी Protean किंवा UTIITSL या वेबसाइटचा वापर करू शकता. तरीही समस्या असल्यास तुमच्या घराजवळील PAN सेवा केंद्रास भेट देऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून घ्यावे. 

Advertisement
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो?
  • पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्ही इनकम टॅक्स रीटर्न फाइल प्रक्रिया करू शकणार नाही, आयकर परतावाही मिळू शकणार नाही. 
  • बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होतील. 
  • शेअर बाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि इतर सर्व केवायसी-संबंधित प्रक्रिया रखडतील.
  • याव्यतिरिक्त टीडीएस आणि टीसीएसमध्ये जास्त कपात होऊ शकते, ज्याचा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.

(नक्की वाचा: SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन)

शेअर बाजार आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खास अलर्ट

जे लोक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतील त्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास ट्रेडिंग अकाउंट आणि गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. 

Advertisement
शेवटची तारीख काय आहे?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. यानंतर पॅन कार्ड बंद झाल्यास थेट तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम होऊ शकतात.