Peanut benefits : शेंगदाणा, ज्याला आपण 'गरीबांचे बदाम' असेही म्हणतो, तो एक अतिशय स्वस्त, स्वादिष्ट आणि पोषणतत्त्वांनी परिपूर्ण असा स्नॅक आहे. थंडीच्या दिवसांत अनेक लोक उबदार पांघरूणात बसून टीव्ही पाहताना शेंगदाणे खाण्याचा आनंद घेतात, तर काही जण सकाळी ब्रेडवर पीनट बटर लावून त्याचे सेवन करतात. शेंगदाणे केवळ चवीलाच चांगले आहे असं नाही, तर आरोग्यासाठीही त्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
रोजच्या आहारात शेंगदाण्याचा समावेश केल्यास शरीराला नेमके कोणते फायदे होतात आणि त्यात कोणते महत्त्वाचे जीवनसत्त्वे (Vitamins) आढळतात, हे सविस्तर जाणून घेऊया.
शेंगदाण्यात कोणती जीवनसत्त्वे आढळतात?
शेंगदाणा हा अनेक महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा (Vitamins) नैसर्गिक स्रोत आहे. विशेषतः खालील तीन जीवनसत्त्वे त्यात मोठ्या प्रमाणात असतात
जीवनसत्त्व (Vitamin) ई: हे त्वचेसाठी (Skin) आणि केसांसाठी खूप चांगले मानले जाते.
जीवनसत्त्व (Vitamin) बी3 (नियासिन): हे मेंदू (Brain) आणि मज्जातंतूंच्या (Nerves) आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
जीवनसत्त्व (Vitamin) बी9 (फोलेट): हे रक्त तयार करण्यासाठी आणि गर्भवती महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
( नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )
रोज शेंगदाणा खाल्ल्यास शरीराला मिळतील 'हे' महत्त्वाचे फायदे
शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. मुख्यत्वे हृदयविकार आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो
हृदय (Heart) मजबूत होतो: शेंगदाण्यामध्ये मोनोसॅचुरेटेड (Monounsaturated) आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स (Polyunsaturated Fats) आढळतात, जे हृदयासाठी खूप चांगले मानले जातात. हे फॅट्स शरीरातील 'खराब कोलेस्टेरॉल' (LDL) कमी करून 'चांगल्या कोलेस्टेरॉलला' (HDL) वाढविण्यात मदत करतात. यामुळे हृदयविकारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते.
हाडे आणि स्नायू (Bones and Muscles) बळकट होतात: शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी आवश्यक खनिजे (Minerals) असतात. ही खनिजे हाडे आणि स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर अधिक सक्रिय राहू शकते.
वजन नियंत्रणात (Weight Control) राहते: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी शेंगदाणा एक उत्तम स्नॅक आहे. यामध्ये प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) दोन्ही मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. अनहेल्दी स्नॅक्सऐवजी मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
( नक्की वाचा : Alcohol Effects: 'तेच ड्रिंक, तितकीच क्वांटिटी...' तरीही महिलांना दारु लवकर का चढते? 'ही' आहेत 3 सिक्रेट्स )
मेंदूची कार्यक्षमता वाढते: शेंगदाण्यामध्ये असलेले जीवनसत्त्व बी3 आणि नियासिन हे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. त्याचे नियमित सेवन केल्यास स्मरणशक्ती (Memory) वाढू शकते आणि तणाव (Stress) कमी करण्यासही मदत मिळते.
एकंदरीत, शेंगदाणा हा हृदयाचे आरोग्य जतन करण्यासाठी, हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा योग्य प्रमाणात समावेश करणे फायद्याचे ठरू शकते.
( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर अधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क या माहितीच्या जबाबदारीचा दावा करत नाही.)