Period Pain: मासिक पाळीत पोट खूप दुखतंय? हे आहेत सोपे घरगुती उपाय, वेदनांपासून अशी मिळवा झटपट सुटका

औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी महिलांनी नैसर्गिक उपाय करून पाहावेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखी आणि कंबरदुखीवर नैसर्गिक घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात
  • भाजलेली मेथी, जिरे, ओवा आणि बडीशेप यांचे मिश्रण कोमट पाणी, दूध किंवा ताकासोबत घेणे उत्तम
  • पोटाच्या खालच्या भागाला गरम पाण्याचा शेक द्याल तर रक्ताभिसरण सुधारते आणि मासिक वेदना कमी होतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

How Can I Relieve Period Pain Fast: मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी आणि कंबरदुखी ही अनेक महिलांसाठी एक मोठी समस्या असते. वैद्यकीय भाषेत याला 'डिस्मेनोरिया' असे म्हणतात. काही महिलांना हा त्रास इतका तीव्र होतो की त्यांना दैनंदिन कामे करणेही कठीण जाते. अशा वेळी औषधांऐवजी नैसर्गिक घरगुती उपायांचा अवलंब केल्यास आराम मिळू शकतो. अनेक जण त्याचा अवलंब ही करतात. त्यामुळे त्यांना आराम मिळतो.  

मासिक पाळीत पोटदुखी किंवा कंबरदुखी टाळण्यासाठी मेथी, जिरे, ओवा आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन ते भाजून त्याचे मिश्रण तयार करा. दिवसातून दोनदा साधारण 5 ग्रॅम हे मिश्रण कोमट पाणी, दूध किंवा ताकासोबत घेतल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि पेटके कमी होतात. हा उपाय केल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल. शिवाय वेदना ही कमी होतील. 

नक्की वाचा - Personality Color Test : आवडता रंग उलगडणार तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं रहस्य, प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घ्या

पोटदुखीवर सर्वात सोपा उपाय म्हणजे गरम पाण्याचा शेक. गरम पाण्याची पिशवी पोटावर किंवा कंबरेवर 10 ते 15 मिनिटे ठेवल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात. तसेच, आहारात लसणाचा समावेश करणे फायदेशीर ठरते. लसणामध्ये दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म असल्याने ते सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.मासिक पाळीतील पोटदुखी आणि कंबरेतील पेटके कमी करण्यासाठी घरगुती उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. 

नक्की वाचा - Home Remedies: भूक लागत नाहीये? मग 'हे' 5 घरगुती उपाय करून नक्की पाहा, झटपट वाढेल भूक

औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी महिलांनी खालील नैसर्गिक उपाय करून पाहावेत

बियाणांचे चूर्ण: 

  • भाजलेली मेथी, जिरे, ओवा आणि बडीशेप यांचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटातील कळा थांबतात.

गरम पाण्याचा शेक: 

  • पोटाच्या खालच्या भागाला गरम पाण्याच्या पिशवीने 10 मिनिटे शेक द्यावा.

कोरफडीचे सेवन: 

  • पाळी येण्यापूर्वी काही दिवस आधीपासून कोरफडीचा गर खावा. यामुळे मूड बदलणे (Mood Swings) आणि वेदना नियंत्रित राहतात.

आहार: 

  • आहारात लसणाचे प्रमाण वाढवावे, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

आराम आणि व्यायाम: 

  • शरीराला पुरेसा आराम द्यावा आणि अत्यंत हलका व्यायाम करावा.