Does Your Favorite Color Reveal Your Personality: जगण्यात रंगाचं महत्त्व आहे. रंगांशिवाय जीवन अपूर्ण आहे. मात्र तुमचे आवडे रंग तुमचं सिक्रेट उघड करू शकतात. प्रत्येक रंगाचा एक अर्थ असतो. जर तुम्हाला एखाद्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याच्या आवडत्या रंगावरुन ओळखू शकता.
कोणत्या रंगाचा काय आहे अर्थ? (Know here what each color means)
1. लाल
अनेकांना लाल रंग आवडतो. तुम्हालाही हा रंग आवडत असेल तर या रंगाविषयी जाणून घेऊया. लाल रंग उत्साहाचा रंग आहे. याकडे रागाचं प्रतिक म्हणूनही पाहिलं जातं. हिंदू धर्मात शुभ आणि नव्या सुरुवातीचं प्रतीकदेखील लाल रंग आहे.
2. निळा
निळा रंग विश्वास, प्रामाणिकपणे, शांती आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं. ज्यांना निळा रंग आवडतो ते अत्यंत दयाळू असतात, असं मानतात.
3. हिरवा
ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो त्यांच्या मन आणि मेंदू यामध्ये चांगलं संतुलन असतं, असं मानलं जातं. या व्यक्ती शांत मनाच्या असतात आणि त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देतात.
4. पिवळा
तसं पिवळा रंग हिंदू धर्मासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र पिवळा रंग पसंत करणारे लोक घाबरट असतात. असे लोक थोडे निराशावादीही असतात.
5. पांढरा
पांढरा रंग मैत्री, शांतता आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. हा रंग एकता, सद्भावना आणि समानतेचं प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग आवडणारी व्यक्ती मनाने निर्मळ असते.
6. नारंगी
नारंगी रंग ऊर्जा, उत्साह,आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग आवडणारे लोक अत्यंत आशावादी असतात.
7. काळा
काळा रंग शक्ती, गूढता, औपचारिकता, भव्यता आणि अधिकाराचे प्रतीक आहे. हा रंग अंधार, दुःख आणि वाईटाशी देखील संबंधित आहे. ज्यांना हा रंग आवडतो अशा व्यक्ती त्यांच्याच विचारात हरवलेली असतात.
८. गुलाबी -
ज्यांना गुलाबी रंग आवडतो ते दयाळू असतात.
(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world