persimmon fruit : हे फळ तुम्हाला माहीत आहे का? सध्या ट्रेंड होतंय; हृदयपासून इम्युनिटीपर्यंत 5 जबरदस्त फायदे

सध्या सोशल मीडियावर आम्रफळाची रेसिपी व्हायरल होत आहेत तर अनेक ठिकाणी याला सुपरफूड म्हटलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

persimmon fruit benefits : सोशल मीडियावर सध्या नारंगी रंगाचं पर्सिमॉन नावाचं फळ चर्चेत आहे. हे फळ मराठीत आम्रफळ नावाने ओळखलं जातं. सध्या सोशल मीडियावर आम्रफळाची रेसिपी व्हायरल होत आहेत तर अनेक ठिकाणी याला सुपरफूड म्हटलं जात आहे. पोषणाच्या दृष्टीनेही हे फळ अत्यंत पॉवरफूल मानलं जात आहे. आशियात थंडीच्या दिवसात हे फळ खाल्लं जातं. आम्रफळात विटॅमिन, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पचनक्रिया सुधारणे आणि वजन नियंत्रणासाठी फायदेशीर आहे.

आम्रफळाचे पाच महत्त्वाचे फायदे जाणून घेऊया.

१ आम्रफळात बीटा कॅरोटीन, फ्लेवोनॉयड्स आणि टॅनिनसारखे शक्तीशाली अँटीऑक्सिडेंट असतात. हे फळ शरीरातील फ्री रेडिकल्समुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत करतं. याशिवाय एजिंग, हृदयाचे आरोग्य आणि सूज निर्माण होण्याचा धोका कमी करतं. आम्रफळाच्या सेवनाने शरीरातील अँटीऑक्सिडेंटची पातळी वाढते.

नक्की वाचा - Shingada Fruit : बाजारात शिंगाडे दिसले म्हणून लगेच खाऊ नका; कुणासाठी शिंगाडा त्रासदायक, जाणून घ्या!

२ आम्रफळातील फायबर, पोटॅशियम आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तत्व हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

३ एका मध्यम आकाराच्या आम्रफळात तब्बल सहा ग्रॅम फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येतून दिलासा मिळतो. यामधील पेक्टिनसारखे फायबरमुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पोटातील सुज कमी करण्यास मदत करतं.

Advertisement

४ आम्रफळात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत राहते. विटॅमिन ए त्वचा आणि म्युकस मेम्ब्रेनची सुरक्षा करतं. तर विटॅमिन सी इन्फेक्शनशी दोन हात करणे आणि जखमा भरण्यास मदत करतं.

५ आम्रफळात ग्लायसेमिक इंजेक्स कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त. ज्यामुळे रक्तातील साखर जलद गतीने वाढत नाही. या एका फळात १८ कॅलरीज असून बराच वेळ पोट भरून राहतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)