पितृपक्षामध्ये दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, पितृदोष कमी होण्यास मिळेल मोठी मदत 

Pitru Paksha 2024: पितृ पक्षामध्ये दिवा लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Advertisement
Read Time: 2 mins

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मामध्ये पहाटे, संध्याकाळी तसेच कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. पितृपक्षामध्ये दिवे लावल्यास अधिक महत्त्व वाढते. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण कोणत्या पद्धतीने दिवे लावल्यास पितृदोष कमी होण्यास मदत मिळेल, याची माहिती जाणून घेऊया... 

दक्षिण दिशेला दिवा लावावा

वास्तूशास्त्रानुसार दिवा लावणे शुभ मानले जाते. पितृपक्षामध्येही दिवा लावणे आणि विशेषतः दक्षिण दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. कारण ही दिशा पितरांची मानली जाते. त्यामुळे या दिशेला उपाय केल्यास पितृदोष दूर होण्यास मदत होऊ शकते, असे म्हटले जाते. 

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

मोहरीचे तेल

पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते. याव्यतिरिक्त पितरांचाही आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात.

गाईचे तूप

घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नियमित गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीदेवीची तुमच्यावर कायम कृपादृष्टी देखील राहते. तुपाच्या दिव्यामुळे पूर्वजांनाही आनंद होतो, असे मानले जाते. 

(नक्की वाचा: प्रभू श्रीरामाच्या नावावरून तुमच्या मुलाचे ठेवा सुंदर आणि अर्थपूर्ण नाव)

पिंपळाच्या झाडाचा उपाय

पिंपळाच्या झाडावर देवी-देवतांसह पूर्वजांचाही निवास असतो, अशी मान्यता आहे. पितृपक्षामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते.

पिण्याच्या पाण्याजवळ दिवा का लावावा?

पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावावा. यामुळेही पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते, असे म्हटले जाते.

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Topics mentioned in this article