Pitru Paksha 2025 Calendar: 7 की 8 सप्टेंबर कधीपासून सुरू होतोय पितृपक्ष? जाणून घ्या श्राद्धच्या तिथी

Pitru Paksha 2025 Calendar: भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पौर्णिमेनंतर ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्षाचा काळ असतो. यंदा पितृपक्ष कधीपासून सुरू होतोय आणि श्राद्ध तिथींबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
Pitru Paksha 2025 Calendar: पितृ पक्ष कधीपासून सुरू होतोय?

Pitru Paksha 2025 Calendar: आपल्या पूर्वजांना 'पितर' म्हणून संबोधले जाते. त्यांच्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा 15 दिवसांचा काळ महत्त्वपूर्ण मानला जातो. या काळामध्ये पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान इत्यादी गोष्टी विधीवत श्रद्धापूर्वक करण्याची परंपरा आहे. पिंडदान हे पितरपूजेचा मूळ विधी आहे. यंदा पितृपक्ष पक्ष कधीपासून सुरू होतोय, शेवटचा दिवस कधी आहे,  कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? वाचा सर्व माहिती. 

1. सोमवार 8 सप्टेंबर 2025 प्रतिपदा श्राद्ध
2. मंगळवार 9 सप्टेंबर 2025 द्वितीया श्राद्ध
3. बुधवार 10 सप्टेंबर 2025 तृतीया श्राद्ध/चतुर्थी श्राद्ध
4. गुरुवार 11 सप्टेंबर 2025 पंचमी श्राद्ध (भरणी श्राद्ध)
5. शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 षष्ठी श्राद्ध

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: Pitru Paksha 2025: पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची आहे? करा 'हे' 7 सोपे उपाय)

6. शनिवार 13 सप्टेंबर 2025 सप्तमी श्राद्ध
7. रविवार 14 सप्टेंबर 2025 अष्टमी श्राद्ध
8.  सोमवार 15 सप्टेंबर 2025 नवमी श्राद्ध (अविधवा)

Photo Credit: PTI

9.  मंगळवार 16 सप्टेंबर 2025 दशमी श्राद्ध
10. बुधवार 17 सप्टेंबर 2025 एकादशी श्राद्ध
11. गुरुवार 18 सप्टेंबर 2025 द्वादशी श्राद्ध (संन्यासिना महालय) 

Advertisement

Photo Credit: PTI

12. शुक्रवार 19 सप्टेंबर 2025 त्रयोदशी श्राद्ध 
13. शनिवार 20 सप्टेंबर 2025 चतुर्दशी श्राद्ध (शस्रादिहत पितृश्राद्ध)
14. रविवार 21 सप्टेंबर 2025 सर्वपित्री अमावस्या श्राद्ध 

Photo Credit: PTI

  • भरणी श्राद्ध 11 सप्टेंबर 2025 रोजी आहे.
  • अविधवा नवमी श्राद्ध 15 सप्टेंबर 2025 रोजी आहे. 
  • पौर्णिमेचा महालय सप्टेंबर 11, 14, 15, 18, 21 यापैकी कोणत्याही दिवशी करावा. 
  • 15 नोव्हेंबर रोजी महालय समाप्तीपर्यंत पितृपक्षातील महालय श्राद्ध करता येते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)