Office Politics Tips: ऑफिसमध्ये तुम्हालाही चापलूस सहकाऱ्यांमुळे त्रास होतोय? प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला ऐका

Office Politics Tips: ऑफिस पॉलिटिक्सला कंटाळले आहात का? प्रामाणिक राहूनही न्याय मिळत नाहीय का? तर मग प्रेमानंद महाराजांनी दिलेला सल्ला नक्की ऐका.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Premanand Maharaj Advice: ऑफिसमधल्या पॉलिटिक्सला कंटाळलेल्या प्रत्येकाने ऐकावा असा व्हिडीओ"

How To Deal With Office Politics: ऑफिसमधील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी काही लोक प्रामाणिक काम करतात तर काही लोक चांगले काम करणाऱ्या मंडळींना त्रास देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे एकमेकांचे पाय खेचण्याचे काही लोकांचे प्रयत्न कायम सुरूच असतात. पण यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना फार क्वचितच न्याय मिळतो. तरीही ती मंडळी लोकांचा त्रास त्यांच्या कामामध्ये आणत नाहीत. स्वतःची जबाबदारी ते चोख पद्धतीने पार पाडतात. ही परिस्थिती आता जवळपास सर्वच ऑफिसमध्ये पाहायला मिळते. याचसंदर्भात एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारलाय आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संबंधित व्यक्तीने महाराजांकडे मनातील भावना व्यक्त करत म्हटलं की, "ऑफिसच्या ठिकाणी एकमेकांना कमीपणा दाखवून, बॉसची चापलुसी करुन लोक स्वतःची कामं करुन घेतात, असंच काहीसे माझ्यासोबतही घडतंय, काय करू?".

ऑफिस पॉलिटिक्सवर प्रेमानंद महाराजांनी नेमके काय म्हटलं? 

ऑफिस पॉलिटिक्स कसे हाताळावे, याबाबत उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, "आपण खऱ्या बॉसचा विचार करावा, त्याच्या मागे धावावे. खोट्या बॉसला कोणीही फसवतील, त्याची चापलुसी करतील. पण खऱ्या बॉसकडे कोणाचीही चापलुसी चालत नाही. खऱ्या बॉसला खूश कला तर नकली बॉसही तुमच्याकडे येतील. देव ज्यावर कृपा करतो, त्यावर सर्वांची कृपा असते तर आपण देवाची कृपादृष्टी मिळवण्याऐवजी माणसांची कृपा मिळवण्याची इच्छा बाळगतो. माणसाची कृपा कधी मिळू शकणार नाही. कारण ते स्वार्थी, धूर्त आणि कपटी असतात. एक साहेब असे आहेत की तुमच्याकडून कितीही चुका होवो, ते आपल्याला कधीही सोडत नाहीत, ते म्हणजे देव. दुसरा कोणताही साहेब असा होऊ शकत नाही. दुसरा साहेब स्वार्थी भेटेल, तुमची चूक झाली तर तुम्हाला हृदयाशी कवटाळणारा नसेल. त्यामुळे मला वाटतं की मोठ्या बॉसची संवाद साधला पाहिजे, सर्व बॉसचे बॉस म्हणजे देवाशी संवाद करायला हवा. माणसांची नव्हे तर देवाची कृपा मिळवा".

खऱ्या बॉसची चापलुसी केल्यास काय मिळेल, असाही प्रश्न पुढे त्या व्यक्तीने महाराजांना विचारला. 
यावर महाराज म्हणाले की, "काय मिळणार नाही, असा विचार करा. सर्व त्याचेच आहे, सर्वच मिळेल."

(नक्की वाचा: Navratri 2025: पीरियड्समध्ये नवरात्रीची पूजा करणे योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराज जे म्हणाले ते ऐकून...)

तर मंडळींनो एकूणच तुमचं काम चांगलं असेल ना तर लोक तुम्हाला त्रास देणारच. त्या-त्या वेळेस या सर्व गोष्टी तुमच्यासाठी असह्य असू शकतील. पण संयम बाळगा, शांत राहा. तुमच्यातील सच्चेपणा कायम टिकवून ठेवा. 

Advertisement