Raksha Bandhan 2024: भावाला त्याच्या राशीनुसार बांधा राखी, कोणत्या राशीसाठी कोणता रंग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरेल?

Raksha Bandhan 2024: ज्योतिषाचार्यांच्या मते यंदाच्या रक्षाबंधन सणाला सौभाग्य योग, शोभन योग, रवि योग आणि सिद्ध योग जुळून आले आहेत. तसेच रक्षाबंधन सोमवारी असल्याने हा योग अतिशय शुभ मानला जात आहे. पण सणावर भद्रकाळाचेही सावट आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Raksha Bandhan Shubh Muhurat: हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. यंदा रक्षाबंधनाच्या सणाला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. ज्योतिषाचार्यांच्या मते सौभाग्य योग, शोभन योग, रवि योग आणि सिद्ध योग असे चार योग जुळून आले आहेत. तसेच यंदा रक्षाबंधन सोमवारी आल्याने हा योग अतिशय शुभ मानला जात आहे. पण सणावर भद्रकाळाचेही सावट आहे, त्यामुळे याकडे तितकेचे लक्ष देणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time: रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि सणाचे महत्त्व)

दुपारपर्यंत आहे भद्रकाळाचे सावट?

भद्रकाळ सोमवारी दुपारी 1:24 वाजेपर्यंत समाप्त होईल. यानंतर रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तास सुरुवात होईल. ज्योतिषाचार्यांच्या मते, भद्राचे निवास पाताळामध्ये आहे, त्यामुळे हा काळ अधिक अशुभ मानला जात नाही. भद्राचा निवास जेव्हा पाताळामध्ये अथवा स्वर्गामध्ये असतो तेव्हा पृथ्वीवर याचा अधिक परिणाम होत नाही. असे असले तरीही भद्रकाळामध्ये राखी बांधणे शुभ मानले जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार, भद्रकाळात शूर्पणखेने रावणाला राखी बांधली आणि रावणाचे संपूर्ण साम्राज्य नष्ट झाले.

Advertisement

(नक्की वाचा: Raksha Bandhan Wishes: ओवाळीते भाऊराया रे!भाऊ-बहिणीला हे खास मेसेज पाठवून व्यक्त करा तुमची माया)

कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची राखी बांधणे ठरेल शुभ?

मेष रास - लाल रंगाची राखीमुळे भावाच्या जीवनामध्ये ऊर्जा आणि आनंद टिकून राहील. 
वृषभ रास - आकाशी/पांढऱ्या रंगाची राखी शुभ ठरेल.
मिथुन रास - निळ्या/हिरव्या रंगाची राखी भावासाठी भाग्यशाली ठरेल.
कर्क रास - पिवळ्या/पांढऱ्या रंगाच्या राखीमुळे जीवनात सुख शांती नांदेल.
सिंह रास - लाल किंवा केशरी रंगाची राखी जीवनात आनंद घेऊन येईल.
कन्या रास - पांढऱ्या/आकाशी रंगाच्या राखीमुळे भावाचे भाग्य उजळेल.  

Advertisement

(नक्की वाचा: राखी पौर्णिमेच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करावा का? काय आहे नियम?)

तुळ रास - पांढऱ्या/निळ्या रंगाची राखीमुळे भावाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
वृश्चिक रास - लाल रंगाची राखी भावाला बांधल्यास त्याच्या जीवनात सुख येईल आणि चांगले भाग्य घेऊन येईल. 
धनु रास - केशरी रंगाची राखी बांधल्यास यामुळे समाजातील पद-प्रतिष्ठा वाढेल. 
मकर रास - हिरव्या रंगाच्या राखीमुळे भावाच्या जीवनातील अडथळे दूर होतील. 
कुंभ रास - निळ्या रंगाची राखी भावाला बांधावी, यामुळे प्रगतीचे द्वार उघडतील.
मीन रास - पिवळ्या रंगाची राखी बांधणे भावासाठी शुभ ठरेल. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.